दिवाळीच्या काळामध्ये एक लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज; व्यापाऱ्यांना दिलासा

| Updated on: Nov 03, 2021 | 6:33 PM

गेल्या दोन वर्षांत खरेदीची फारशी संधी न मिळाल्याने ग्राहक यावर्षी दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे पहायला मिळत आहे. या काळात एक लाख कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापारी संघटना कॅटने म्हटले आहे.

दिवाळीच्या काळामध्ये एक लाख कोटींच्या उलाढालीचा अंदाज; व्यापाऱ्यांना दिलासा
Follow us on

नवी दिल्ली – उद्या दिवाळी आहे. दिवाळीच्या काळामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. ग्राहक मोठ्या प्रमाणत खरेदी करतात. खरेदी वाढल्यामुळे बाजारात देखील मोठी उलाढाल पाहायला मिळते. मात्र गेल्या वर्षी देशभारत कोरोनाचे संकट असल्याने सर्व बाजारपेठा ठप्प होत्या. परंतु यावर्षी पुन्हा एकदा बाजारपेठा नव्या जोमाने सजल्या आहेत. गेल्या वर्षी खरेदीची संधी न मिळाल्याने, यावर्षी ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. दिवाळीच्या या काळामध्ये एक लाख कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल होऊ शकते असा अंदाज व्यापारी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅटने व्यक्त  केला आहे. त्याचप्रमाणे येत्या डिसेंबरपर्यंत हा आकडा 3 लाख कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो असे देखील संघटनेने म्हटले आहे.

यावेळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की, गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे बाजारापेठा ठप्प होत्या, मात्र यंदा कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्याने, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच लसीकरणाचा देखील वेग वाढल्याने बाजारपेठा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. गेल्या वर्षी खरेदीची संधी न मिळाल्याने, यावर्षी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.

 व्यापार 3 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज 

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी सांगितले की, या दिवाळीपासून ते डिसेंबर अखेरपर्यंत बाजारपेठेत मोठी उलाढाल पहायला मिळणार असून, या काळात बाजारपेठ 3 लाख कोटी रुपयांचा टप्प ओलांडू शकते. गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठ ठप्प असल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता, त्यांचे नुकसान झाले होते. मात्र आता खरेदी वाढत असल्याने व्यापाऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. ते पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने मध्यम वर्गीयांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसा जामा झाला आहे. त्याचप्रमाणे रोजगारामध्ये देखील वाढ झाल्याने,ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढला आहे.

चीनी मालावर बहिष्कार 

दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून कॅटच्या वतीने चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे अभियान सुरू आहे. हे अभियान अजूनही सुरूच असून, या अभियानांतर्गत आम्ही व्यापाऱ्यांना चीनी मालाची खरेदी विक्री न करण्याचे आवाहन करत आहोत, अशी माहिती भरतिया यांनी दिली आहे. सरकार देखील चीनी माल भारतात बॅन करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

 

संबंधित बातम्या 

एसबीआयच्या नफ्यात वाढ; एनपीए खात्यांची संख्या देखील घटली

आधार कार्डचा गैरवापर केल्यास पडणार भारी, UIDAI आता 1 कोटींचा दंड करण्याची शक्यता