एसबीआयच्या नफ्यात वाढ; एनपीए खात्यांची संख्या देखील घटली

स्टेस्ट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वतीने नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे, या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात भरघोस वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

एसबीआयच्या नफ्यात वाढ; एनपीए खात्यांची संख्या देखील घटली

नवी दिल्ली – स्टेस्ट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वतीने नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे, या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात भरघोस वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. संपलेल्या तिमाहीमध्ये बँकेच्या नफ्यात  वार्षिक आधारावर तब्बल 66.7 टक्के वाढ झाली असून, बँकेचा एकूण नफा 7,626.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच एनपीए आकांऊटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये बँकेचा एनपीए रेशो हा 5.32 टक्के एवढा होता, तर नुकत्याच संपले्या तिमाहिमध्ये त्यात घट होऊन तो 1.52 टक्क्यांवर आला आहे.

व्याजदरातून मिळणारा नफा वाढला 

दरम्यान दुसरीकडे एसबीआयच्या व्याजदरातून मिळणाऱ्या नफ्यात देखील वाढ झाली असून,  चालू वर्षामध्ये नफा 31,183.9 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वार्षीक आधारावर नफ्यामध्ये तब्बल 29 टक्के वाढीची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या तिमाहिमध्ये सेव्हिंग आकांऊट आणि  करंट आकांऊटचे खातेदार देखील वाढले असून,  सेव्हिंग आकाऊंटमधील रकमेमध्ये 10.55 टक्क्यांची तर करंट आकांऊटमधील रकमेमध्ये 19.20 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती या अहवालामधून समोर आली आहे. तसेच बँकेच्या स्लिपेज रेशोमध्ये देखील घट झाली आहे.

होम लोनची मागणी वाढली 

बँकेने सण उत्सवाच्या काळात विविध कर्जावरील व्याजदर कमी केले होते. त्याचा मोठा फायदा बँकेला होताना दिसत आहे. बँकेकडून होम लोन घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असून, सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये होमलोन ग्राहकांची संख्या 10.74 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या परिणामांमुळे पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या 

पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात का, जाणून घ्या सर्वकाही

3.34 लाख रुपयांची KTM 390 Duke स्पोर्ट्स बाइक अवघ्या 98000 रुपयांत, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

आधार कार्डचा गैरवापर केल्यास पडणार भारी, UIDAI आता 1 कोटींचा दंड करण्याची शक्यता

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI