AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3.34 लाख रुपयांची KTM 390 Duke स्पोर्ट्स बाइक अवघ्या 98000 रुपयांत, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील

KTM ची ही बाइक Bikes24 नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे. नवीन KTM 390 Duke ची किंमत जवळपास 3.34 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

3.34 लाख रुपयांची KTM 390 Duke स्पोर्ट्स बाइक अवघ्या 98000 रुपयांत, जाणून घ्या कुठे मिळतेय शानदार डील
KTM 390 Duke
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 03, 2021 | 3:37 PM
Share

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटर किंवा सेकेंड हँड बाईकची निवड करत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक बाईक घेऊन आलो आहोत. केटीएम 390 ड्युक (KTM 390 Duke) असं या बाईकचं नाव आहे. ही बाईक खूपच कमी किंमतीत तुम्ही खरेदी करु शकता. (buy KTM 390 Duke in 100000 rupees, special offer with warranty)

KTM ची ही बाइक Bikes24 नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे, जी सेकंड हँड सेगमेंटची बाइक आहे. नवीन KTM 390 Duke ची किंमत जवळपास 3.34 लाख रुपये इतकी असली तरी सेकंड हँड सेगमेंटमध्ये ही बाईक 1 लाख रुपयांपेक्षा कमी म्हणजेच 98 हजार रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच यावर वॉरंटीदेखील मिळेल.

KTM 390 Duke मध्ये 373 cc इंजिन आहे, जे 42.9 bhp पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या बाईकच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सिस्टम आहे. तसेच या बाइकमध्ये अँटी लॉकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या बाईकचे वजन 150 किलोपेक्षा जास्त आहे. यामध्ये यूजर्सना 13.5 लीटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. ही बाईक 1 लीटर पेट्रोलमध्ये 25 किमी मायलेज देते.

बाईक्स 24 वर सूचीबद्ध केलेल्या माहितीनुसार हे 2016 चे मॉडेल आहे. या बाईकने 19 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच ही सेकेंड ओनर बाइक आहे आणि ती दिल्लीतील DL-06 आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. कंपनीने या बाईकची एक रिपोर्ट लिस्ट जारी केली आहे, ज्यामध्ये सर्व फीचर्सचे स्टेटस जाहीर केले आहेत.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड बाईक घेणार असाल तर सर्व बाजूंनी वाहन तपासून पाहा. बाईकचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, बाईक आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही अॅडव्हेंचर बाईक खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही Bikes24 वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(buy KTM 390 Duke in 100000 rupees, special offer with warranty)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...