
सोने खरेदी नेहमीच लोकांना लाभ देणारी असते. मग दागिन्यांच्या स्वरुपात असो की गुंतवणूक म्हणून. परंतू अनेकांना कन्फ्युजन असते की कोणते सोने बेस्ट असते. 24 कॅरेट, 22 कॅरेट की 18 कॅरेट ? 24 कॅरेटचे सोने हे सर्वात शुद्ध म्हटले जाते. परंतू ते रोजच्या वापरासाठी चांगले असते का ? काय असते हे कॅरेटचे गणित, वाचा…
22 कॅरेट सोने संतुलित असते परंतू ते गुंतवणूकीसाठी चांगले असते का ? आणि 18 कॅरेट डिझाईन – फ्रेंडली आहे. परंतू रिटर्न कसे देईल. या गोष्टी महत्वाच्या असतात. आता सणासुदीचे दिवस आहेत. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज आपण पाहूयात गरज आणि बजेटनुसार कोणते सोने तुमच्यासाठी स्मार्ट चॉईस ( Gold Investment ) होऊ शकते.
24 कॅरेट – सुमारे 99.9 टक्के शुद्ध सोने यात असते. कोणत्याही इतर धातूच्या मिश्रणाचे प्रमाण खूपच कमी असते. हे सोने खूपच नरम असते. या सोन्याचे दागिने तुटण्याचा, खरचटण्याच्या वा झिजण्याची शक्यता अधिक असते. रोजच्या वापरासाठी कमी उपयुक्त
22 कॅरेट – सुमारे 91.6 टक्के + सुमारे 8.4 टक्के अन्य धातू ( तांबे, चांदी ) यांचा समावेश. 24 कॅरेटची तुलनेत जास्त मजबूत असते. रोजच्या वापरासाठी चांगले. हलके वजन असल्याने केव्हाही घालता येते.
18 कॅरेट – सुमारे 75% सोने + 25% अन्य धातूचे मिश्रण असते. सर्वात मजबूत आणि टीकाऊ असते. दैनंदिन वापरासाठी,कोरीव डिझाईनच्या दागिन्यांसाठी सर्वोत्तम पर्याय असते
24 कॅरेट- 1,09,511 रुपये प्रति 10 ग्राम
22 कॅरेट- 1,00,312 रुपये प्रति 10 ग्राम
18 कॅरेट- 82,133 रुपए प्रति 10 ग्राम
( किंमती सोमवार सायं. 6 वाजेपर्यंत IBJA ( इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स एसोसिएशननुसार )
जर तुम्ही अंत्यत सुंदर पिवळे धमक दागिने हवे असतील, जास्त चमकणारे आणि हलके कानातले, पेंडेंट वगैरे घालण्यासाठी दागिने हवे असतील तर 24 कॅरेटचे दागिने सुंदर दिसतील.
जर रोज घालण्यासाठी दागिने हवे असतील तर उदा. बांगड्या, अंगठ्या ज्या कामकाज करताना, हाथ धुताना खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर 22 कॅरेटची दागिने मध्यम स्वरुपाचे म्हणून चांगले ठरतील.
जर दागिने एकदम कोरीव डिझाईनचे आणि रोज घालण्यासाठी हवे असतील आणि खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर 18 कॅरेट तुमच्यासाठी उत्तम आहे. सोने व्यापाऱ्याच्या मते प्रत्येक कॅरेट त्याच्या जागी उत्तम आहे. सणासुदीचा मोसम, तुमचे बजेट आणि दागिन्यांची सवय आणि उपयोग हे ध्यानात घेऊन दागिने खरेदी करावेत. जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर शुद्धता महत्वाची असते. परंतू रोजचा वापरासाठी त्याची मजबूती आणि बजेटही महत्वाचे ठरते.