कोणाला मिळतील 7,900 कोटी; Ratan Tata यांनी या 4 लोकांच्या खांद्यावर दिली जबाबदारी

Ratan Tata Will : रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. उद्योग जगताला त्याचा मोठा फटका बसला. रतन टाटा यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची नियुक्ती झाली. रतन टाटा यांनी त्यांच्या पाठीमागे जवळपास 7,900 कोटींची मालमत्ता सोडली. त्यांनी मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीसाठी चार लोकांवर जबाबदारी टाकली आहे.

कोणाला मिळतील 7,900 कोटी; Ratan Tata यांनी या 4 लोकांच्या खांद्यावर दिली जबाबदारी
रतन टाटा
| Updated on: Oct 18, 2024 | 12:26 PM

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्यांनी पाठीमागे जवळपास 7,900 कोटींची मालमत्ता मागे सोडली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी जवळचे मित्र वकील डेरियस खंबाटा आणि सहकारी मेहली मिस्त्री यांच्या खांद्यावर मृत्यपत्रानुसार पुढील निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणीची जबाबदारी टाकली आहे. सोबतच त्यांची सावत्र बहीण शिरीन आणि डियना जीजीभॉय यांना पण त्यासाठी नेमले आहे. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 वर्षी निधन झाले होते. सध्या त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टाटा ट्रस्ट्सची टाटा समूहाची कंपनी टाटा सन्समध्ये 66% वाटा आहे. टाटा हा देशातील सर्वात मोठे औद्योगिक समूह आहे.

हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्समध्ये 0.83% हिस्सेदारी आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 7,900 कोटी रुपये होती. या संपत्तीमधील एक मोठा हिस्सा दान करण्यात यावा अशी टाटा यांची इच्छा होती. त्यांचा जवळपास तीन चतुर्थांश वाटा टाटा सन्समध्ये आहे. याशिवाय टाटाने ओला, पेटीएम, टॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकरो, अर्बन कंपनी आणि अपस्टॉक्ससह दोन डझन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यातील काही कंपन्यांमध्ये त्यांनी त्यांचा वाटा विकला आहे.

कुठं कुठं केली गुंतवणूक

मुंबईतील कुलाबा परिसरात त्यांचे मोठे घर आहे. त्यांच्याकडे अलिबाग येथील अरबी समुद्राजवळ एक हॉलिडे होम आहे. टाटा यांच्या मृत्यूपत्रात काय आहे हे समोर आलेले नाही. मेहली मिस्त्री रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू आहेत. तर सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या दोन्ही ट्रस्टचा टाटा सन्समध्ये एकूण 52 टक्के हिस्सेदारी आहे. समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये टाटा सन्सची हिस्सेदारी बाजाराच्या एकूण 16.71 लाख कोटी रुपये आहे. सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे नवीन चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टाटा ट्रस्ट्सची टाटा समूहाची कंपनी टाटा सन्समध्ये 66% वाटा आहे.