8th Pay Commission: मोठी आनंदवार्ता! 8 वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच 3 टक्के महागाई भत्ता, अपडेट वाचली का?

8th Pay Commission DA Hike: 8 व्या वेतन आयोगाविषयी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. पगार वाढीसह पेन्शन वाढीसाठी कर्मचारी संघटना प्रयत्नशील आहे. त्यापूर्वी महागाई भत्त्यात वाढ होईल.

8th Pay Commission: मोठी आनंदवार्ता! 8 वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच 3 टक्के महागाई भत्ता, अपडेट वाचली का?
8 वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच 3 टक्के महागाई भत्ता
| Updated on: Aug 06, 2026 | 11:15 AM

केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांसाठी आनंदवार्ता आणली आहे. जुलै 2026 मध्ये महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामगार मंत्रालयाने जून 2026 चा महागाई निर्देशांक CPI-IW आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता जुलैमध्ये महागाई भत्त्याविषयी गणना करण्यात येईल. ताज्या आकडेवारीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता मिळू शकतो. त्यानंतर DA 60 टक्क्यांहून 63 टक्के इतका होईल. सर्वच वस्तू महाग झालेल्या असताना महागाई भत्ता वाढणार असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

8 व्या वेतन आयोगापूर्वी सर्वात मोठी वाढ

जुलै 2026 मध्ये 7 व्या वेतन आयोगातंर्गत महागाई भत्त्यातील ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. सरकारने 8 व्या वेतन आयोगाची स्थापना केलेली आहे. पण अद्याप आयोगाच्या शिफारशी प्राप्त झालेल्या नाहीत. जोपर्यंत शिफारशी लागू होत नाही. नवीन वेतन आयोग लागू होत नाही. तोपर्यंत नवीन पगार पत्रक लागू होणार नाही आणि त्यानुसार महागाई भत्ताही ठरणार नाही. सध्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगातंर्गत महागाई भत्ता देण्यात येणार आहे.

जुलैमध्ये डीएची गणना

कामगार आणि रोजगार मंत्रालयातंर्गत कामगार ब्युरोने जून 2026 औद्योगिक कामगारांसाठी महागाई निर्देशांक (AICPI-IW) जाहीर केला आहे. हा आकडा 151.9 इतका नोंदवला गेला आहे. मे 2026 मध्ये हा निर्देशांक 150.8 इतका होता. त्यापेक्षा जूनचा आकडा मोठा आहे. या आधारे आता डीएमध्ये वाढ होणार आहे. मार्च 2026 मध्ये 149.1 वाढून एप्रिल 2026 मध्ये 149.9 इतका होता.सध्याचा 60% महागाई भत्ता वाढून 63% होऊ शकतो.

1 जुलै 2026 रोजीपासून महागाई भत्त्यातील वाढ लागू होईल. याविषयीची अधिकृत घोषणा सरकारच्या अधिसूचनेनंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर करण्यात येईल. गेल्या काही वर्षात जुलैमधील डीएची घोषणा ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करण्यात आली होती. केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्त्यात सुधारणा करते. सध्याचा महागाई भत्ता हा 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात येणार आहे. DA ची गणना CPI-IW च्या 12 महिन्यांच्या सरासरी आधारे करण्यात येते.

फिटमेंट फॅक्टर 3.83 होणार?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टरवरून (Fitment Factor) ठरते. मूळ वेतन वाढीसाठी हा सर्वात मोठा फॅक्टर मानला जातो. 7 व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तज्ज्ञानुसार, महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर असू शकते. तर देशातील विविध कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करावा अशी आग्रही मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us