आता गिअर बदलण्याची गरज नाही, 6 लाखांच्या आत मिळत आहेत या 4 कार, शोरुममध्ये प्रचंड गर्दी
6 लाख रुपयांच्या बजेटमध्ये मिळवा उत्तम फॅमिली कार. मायलेज आणि फीचर्स देखील प्रचंड जबरदस्त. घेण्यासाठी ग्राहकांची दिवाळीपूर्वीच होते शोरुममध्ये गर्दी.

तुम्ही कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट साधारण 6 लाख रुपयांपर्यंत असेल, तर बाजारात तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. कमी बजेटमध्येही आता ग्राहकांना आकर्षक डिझाइन, उत्तम मायलेज, सुरक्षितता आणि आरामदायी केबिन असलेली कार हवी असते. त्यामुळे हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट SUV कारना मोठी पसंती मिळत आहे.
या बजेटमध्ये Tata Motors आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या पाच कारचा विचार करता येऊ शकतो. या कारची किंमत, इंजिन, मायलेज आणि फीचर्स जाणून घेऊया.
Tata Punch
Tata Punch ही कमी बजेटमध्ये SUV सारखा लुक देणारी लोकप्रिय कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,74,990 रुपये आहे. या कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते सुमारे 88 PS पॉवर निर्माण करते. तिचे मायलेज साधारण 18 ते 20 किमी प्रति लिटर आहे. सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग, ABS आणि EBD यांसारखी फीचर्स मिळतात.
Tata Altroz
Tata Altroz ही प्रीमियम हॅचबॅक कार असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,29.990 रुपये असल्याचे दिले आहे. स्टायलिश फ्रंट ग्रिल, LED टेललॅम्प्स आणि 419 लिटरची मोठी बूट स्पेस ही या कारची खास वैशिष्ट्ये आहेत.
या कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, डिजिटल क्लस्टर, 6 एअरबॅग आणि ESP यांसारखी फीचर्स मिळतात. पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज सुमारे 19 ते 20 किमी प्रति लिटर, तर CNG व्हेरिएंटचे मायलेज 26 ते 27 किमी प्रति किलोपर्यंत असल्याचे सांगितले जाते.
Maruti Swift
Maruti Swift ही तरुणांसह कुटुंबांमध्येही लोकप्रिय असलेली हॅचबॅक कार आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,83,900 रुपये आहे. यामध्ये 1.2 लिटर Z-Series पेट्रोल इंजिन मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 24.8 किमी प्रति लिटर, तर AMT व्हेरिएंटमध्ये 25.75 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज मिळते.
Maruti Wagon R
कमी बजेटमध्ये मोठी आणि उपयोगी फॅमिली कार हवी असेल, तर Maruti Wagon R हा चांगला पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 25 किमी प्रति लिटर, तर CNG व्हेरिएंटमध्ये 34 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज मिळते.
