8th pay commission: किमान मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढणार? 8 व्या वेतन आयोगांतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ?

8th pay commission salary hike: रेल्वे कर्मचाऱ्यांनी 8 व्या वेतन आयोगासमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या तिन्ही मागण्या मान्य झाल्यास नेमकी रुपयांची पगार वाढ होईल याबद्दल जाणून घ्या.

8th pay commission: किमान मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढणार? 8 व्या वेतन आयोगांतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ?
8th pay commission salary hike
| Updated on: Nov 09, 2026 | 9:05 AM

केंद्र सरकारी कर्मचारी नेहमीच आठव्या वेतन आयोगाकडून त्यांच्या पगारात आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करतात. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनीही काही मागण्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी तीन मागण्या ठेवल्या आहेत. त्यांच्या तीन मागण्या या किमान मूळ वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीबाबत आहेत. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन’ (NFIR) ने आठव्या वेतन आयोगाकडे अशी शिफारस केली आहे की, किमान मूळ वेतन 69,000 रुपये निश्चित केले जावे. याशिवाय फिटमेंट फॅक्टर ३.८३३ असावा आणि वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून वाढवून ६ टक्के केली जावी.

अन्य मागण्या काय आहेत?

संघटनेच्या मागण्या केवळ मासिक वेतनापुरत्या मर्यादित नाहीत. तर, त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या संपूर्ण सेवाकाळात किमान पाच पदोन्नती मिळण्याची तरतूद, महागाई भत्ता (DA) मूळ वेतनात विलीन करणे आणि सेवानिवृत्तीनंतरच्या पेन्शन लाभांमध्ये सुधारणा करणे यांसारख्या मागण्यांचाही समावेश आहे. मात्र, सध्या या केवळ कर्मचारी संघटनेने मांडलेल्या मागण्या आहेत. त्यांना अद्याप आठव्या वेतन आयोगाची मंजुरी मिळालेली नाही आणि यावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार सरकारकडे असतील. अजूनही याबद्दल निर्णय झालेला नाही.

Loading...

किमान मूळ वेतन कितीपर्यंत वाढवण्याची मागणी?

NFIR ने ८ व्या वेतन आयोगाकडे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ६९,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. यासाठी ३.८३३ इतका ‘फिटमेंट फॅक्टर’ प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या, ७ व्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन ₹१८,००० इतके आहे.

फिटमेंट फॅक्टरचा अर्थ काय?

‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे एक असा गुणांक आहे, ज्याचा वापर विद्यमान मूळ वेतनाचे नवीन वेतन श्रेणीमध्ये रूपांतर करण्यासाठी केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर सध्याच्या ₹१८,००० च्या किमान मूळ वेतनावर ३.८३३ चा फिटमेंट फॅक्टर लागू केला, तर नवीन वेतन रक्कम अंदाजे ₹६९,००० इतकी होते.

वार्षिक वेतनवाढ किती टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव?

रेल्वे कर्मचाऱ्यांची दुसरी प्रमुख मागणी त्यांच्या वार्षिक वेतनवाढीशी संबंधित आहे. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन’ (NFIR) ने वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या ३% वरून ६% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याव्यतिरिक्त, फेडरेशनने असेही सुचवले आहे की, या बदलामुळे कर्मचाऱ्यांना किमान १०,००० रुपयांचा आर्थिक लाभ मिळायला हवा. थोडक्यात सांगायचे तर, वार्षिक वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनात टप्प्याटप्प्याने वाढ होत असते. फेडरेशनच्या मते, सध्याच्या वेतनवाढीच्या दरात बदल केल्यास कर्मचाऱ्यांना अधिक चांगला आर्थिक लाभ मिळू शकेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us