8th Pay Commission: 8 वा वेतन आयोगात शिपाई, शिक्षक…कुणाचा किती वाढणार पगार? कुणाचा मोठा फायदा होणार?

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाची प्रतिक्षा दिवसागणिक वाढत आहे. कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग कधी लागू होतो असे झाले आहे. त्याविषयीची एक एक माहिती सरकारी गोटातून समोर येत आहे. आता काय आली आहे अपडेट?

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोगात शिपाई, शिक्षक...कुणाचा किती वाढणार पगार? कुणाचा मोठा फायदा होणार?
8 वा वेतन आयोग
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 14, 2026 | 2:49 PM

8th Pay Commission Fitment Factor: देशाभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये सध्या केवळ 8 व्या वेतन आयोगाचीच मोठी चर्चा आहे. मोदी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला या नवीन वेतन आयोगाची घोषणा केली. 1 जानेवारी 2026 रोजीपासून या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या आहेत. आता प्रश्न असा उरतो की वेतन लागू झाल्यानंतर कुणाच्या पगारात किती वाढ होईल, कुणाला सर्वाधिक फायदा होईल, याचीही चर्चा रंगली आहे.

1 जानेवारीपासून एरिअर थकबाकी

7 व्या वेतन आयोगाची वैधता 31 डिसेंबर 2025 रोजी संपली आहे. अजून 8 व्या वेतन आयोगाच्या अंतिम घोषणेला उशीर आहे. पण नियमानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन हे 1 जानेवारी 2026 रोजीपासूनच हिशोबात धरले जाणार आहे. म्हणजे अंतिम घोषणा होईपर्यंतची वाढीव वेतनाच्या फरकातील थकबाकी जमा होत आहे. ही थकबाकी एकरकमी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

काय असू शकते फिटमेंट फॅक्टर?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल हे फिटमेंट फॅक्टरवर (Fitment Factor) अवलंबून आहे. नवीन मूळ वेतनाचे गणित मांडण्यासाठीचा हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. 7 व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तज्ज्ञानुसार, महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर असू शकते. तर कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची मागणी केली आहे.

किती वाढणार पगार?

Level 1 ग्रुप ‘D’ (एंट्री लेवल) कर्मचाऱ्यांना सध्या 18,000 वेतन आहे. त्यांचे मूळ वेतन 38,700 रुपये होईल. म्हणजे त्यांना थेट 20 हजारांचा फायदा होताना दिसत आहे.

Level 5 ग्रुप ‘C’ कर्मचाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन 29,200 रुपये इतके आहे. ते वाढून 62,780 रुपये होईल. म्हणजे पगारात 33,580 रुपयांची वाढ होईल.

Level 10 ग्रुप ‘B’ अधिकाऱ्याचे सध्याचे मूळ वेतन 56,100 रुपये इतके आहे. ते वाढून 1,20,615 रुपये होईल. 64,515 रुपयांचा फायदा होईल.

Level 15 ग्रुप ‘A’ वरिष्ठ अधिकाऱ्याचे मूळ वेतन 1,82,200 रुपये आहे. ते 3,91,730 रुपये होईल. त्यांना 2,09,530 रुपयांचा थेट फायदा होईल.

Level 18 कॅबिनेट सचिवाचे मूळ वेतन 2,50,000 रुपये आहे. ते वाढून 5,37,500 रुपये होईल. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला 2,87,500 रुपयांचा फायदा होईल.

Follow Us