8th Pay Commission: कोणत्या कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी? मग जाणून घ्या उत्तर

8th Pay Commission: 8 व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर आणि नवीन वेतन लागू झाल्यावर केवळ मोठ्या अधिकाऱ्यांचाच पगार वाढेल असे नाही तर इतरही कर्मचाऱ्यांच्या वेतनमानात मोठा बदल होईल.

8th Pay Commission: कोणत्या कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी? मग जाणून घ्या उत्तर
8 वा वेतन आयोग, कुणाला लागणार लॉटरी?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 10:55 AM

देशातील जवळपास 48 लाख कर्मचारी आणि 65 ते 69 लाख निवृत्तीधारकांना 8 व्या वेतन आयोगाची प्रतिक्षा लागलेली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये हा आयोग स्थापन झाला. माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. या आयोगाला शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यातील एक मोठा कालावधी संपला आहे. सरकारने अद्याप फिटमेंट फॅक्टरची घोषणा केलेली नाही. पण याविषयीचा अंदाज बांधल्या जात आहे. नवीन वेतन आयोगाचा सर्वाधिक फायदा कोणत्या कर्मचाऱ्यांना होईल याविषयीची चर्चाही होत आहे.

कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

स्तर-1 ते स्तर-2 वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किमान वेतन जवळपास 18,000 रुपये आहे. विविध फिटमेंट फॅक्टरचा विचार करता त्यांचे वेतन वाढून 26,000 ते 34,000 रुपयांदरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला त्यांच्या वेतना मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अगोदरच कमी पगार आहे. नवीन वेतन आयोगामुळे त्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना लॉटरी

नवीन फिटमेंट फॅक्टरनुसार वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना लॉटरी लागेल. स्तर 6,7 वा त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना या नवीन वेतन आयोगाचा सर्वाधिक फायदा होईल. एका अंदाजानुसार 6 आणि 7 श्रेणीतील नवीन कर्मचाऱ्यांना 80 हजार ते 1.10 लाख प्रति महिना वेतन मिळेल. यामुळे खासगी क्षेत्रातील मध्यस्तरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांचा पगार अधिक होईल. HRA आणि TA सारख्या भत्त्यामुळे मूळ वेतनातही फरक दिसले. मूळ वेतन प्राप्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन एचआरए आणि टीएमुळे अधिक वाढलेले दिसले. त्यांना मोठा फायदा होईल. त्यांच्या वेतनात मोठी वाढ झालेली दिसेल.

सेवा निवृत्तीधारकांनाही फायदा

केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नाही तर सेवा निवृत्तीधारकांनाही मोठा दिलासा मिळेल. त्यांची सध्याची किमान पेन्शन 9,000 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरच्या गणितानुसार, 22,500 ते 25,200 रुपयांपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय पेन्शनर्स असोसिएशनने पेन्शनमध्ये 67 टक्के वाढ करण्याची आणि 90 व्या वर्षापर्यंत पेन्शन देण्याची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us