AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डीजे वाजवल्यास चालक, मालक आणि मंडळांवर गुन्हे दाखल होणार, यासोबतच ठाणेदारही…

राज्यभरात विसर्जन मिरवणुकींना सुरूवात झाली. पुण्यातील मानांच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. काही जिल्ह्यात डीजेवर बंदी घालण्यात आली. मोठा पोलिस बंदोबस्त जवळपास जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतोय.

डीजे वाजवल्यास चालक, मालक आणि मंडळांवर गुन्हे दाखल होणार, यासोबतच ठाणेदारही...
DJ
| Updated on: Sep 25, 2026 | 12:01 PM
Share

बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईट वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास चालक, मालक आणि संबंधित मंडळांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजे वाजेल, तेथील ठाणेदारांची तात्काळ बदली केली जाईल, असा कडक इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून तब्बल 202 उपद्रवींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळतंय. डीजे विसर्जन मिरवणुकीत वाजणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. मात्र, ज्या ठाण्याच्या हद्दीत डीजे वाजला, त्या ठाणेदाराची थेट बदली होणार आहे.

गणेशोत्सवच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी व्यापक तयारी केली असून शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरवणुकीसाठी 4 पोलीस उपायुक्त, 7 सहायक पोलीस आयुक्त, 38 पोलीस निरीक्षक, 147 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि 2 हजार 434 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय सर्पफ ची 1 कंपनी, रफ ची 1 कंपनी, दंगा नियंत्रण पथकाच्या 2 प्लाटून आणि 500 होमगार्ड यांचीही मदत घेण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत 12 टास्क फोर्स नियुक्त करण्यात आले असून, नियंत्रण कक्षात अतिरिक्त राखीव मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे. शहरात एकूण 941 सार्वजनिक गणेश मंडळे असून, परिमंडळ-1 मध्ये 409 तर परिमंडळ-2 मध्ये 532 मंडळांचा समावेश आहे. यासोबतच अंदाजे 1 लाख 65 हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.

सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन 25 सप्टेंबर रोजी, तर छावणी परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन आज होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणुकीसोबतच सिडको-हडको, नवीन छत्रपती संभाजीनगर आणि एमआयडीसी वाळूज परिसरातील मिरवणुकांसाठीही स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिमंडळ-1 आणि 2 अंतर्गत स्वतंत्र वाहतूक बंदोबस्त करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी दामिनी पथक आणि शोध पथकांकडून शहरात पेट्रोलिंग केले जाणार आहे.

शहरात एकूण 22 अधिकृत विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींसाठी कर्णपुरा टोका आणि हर्सूल तलाव येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कमी उंचीच्या मूर्तींसाठी विविध विहिरी आणि इतर ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, शहरात 48 संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील पोलीस निरीक्षकांकडे 28 Noise Level Meter उपलब्ध असून, 123 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.यासोबतच गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान खाजगी ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय ड्रोन किंवा इतर उड्डाण उपकरणांचा वापर केल्यास BNS कलम 223 अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Follow Us
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ