AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5099, 5499 AED… लोक अचानक का सर्च करत आहेत हे दोन नंबर?; कारण आलं समोर

गेल्या काही दिवसांपासून 5099, 5499 AED हे नंबर भारतात इंटरनेटवर प्रचंड सर्च होत आहेत. हे नंबर Apple iPhone 18 Pro आणि Pro Max च्या UAE मधील किमती आहेत. दुबईत हे फोन भारतातून लक्षणीयरीत्या स्वस्त मिळत असल्याने, भारतीय ग्राहक दुबईतील किमती भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करून त्यांची तुलना करत आहेत.

5099, 5499 AED... लोक अचानक का सर्च करत आहेत हे दोन नंबर?; कारण आलं समोर
iPhone 18 Pro Dubai priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 12:14 PM
Share

देशात गेल्या काही दिवसांपासून दोन नंबर इंटरनेटवर अधिक सर्च केले जात आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इंटरनेटवर 5099 आणि 5499 हे दोन नंबर वेगाने सर्च केले जात आहेत. या नंबरमध्ये असं काय आहे की जो तो हे नंबर सर्च करत आहे? भारतीयांना या नंबरने झपाटण्यासारखं त्यात एवढं आहे तरी काय? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील. गुगल ट्रेंडच्या मागच्या आठवड्याच्या आकडेवारीत 5099 AED, 5499 AED, 5949 AED आणि 6349 AED आदी नंबर सर्च केल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय लोक थेट ‘AED to INR’ म्हणजे दिरहमचे भारतीय रुपयात रुपांतर करण्याबाबतचे प्रश्न विचारत आहेत. या नंबरमध्ये असं काय आहे की लोक त्याचा वापर करत आहेत? याचाच घेतलेला हा आढावा.

5099 आणि 5499 हे केवळ नंबर नसून त्या यूएईची करन्सी दिरहमच्या किमती आहेत. पण भारतीय लोक अचानक या दोन किमती इंटरनेटवर का सर्च करत आहेत? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. हे नंबर अ‍ॅपलचा नवा आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्सच्या यूएई किमतींशी संबंधित आहे. अ‍ॅपलने यूएईमध्ये आयफोन 18 प्रोची सुरुवात केली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 5,099 AED आणि आयफोन 18 प्रो मॅक्सची सुरुवातीची किमत 5,499 AED ठेवण्यात आली आहे. दोन्ही मॉडल 256GB ने सुरू होतात.

जेव्हा कधी आयफोन लॉन्च होतो तेव्हा लोक दुबईतील फोनच्या किमती सर्च करतात. त्यावरून दुबईत भारतापेक्षा किती स्वस्त फोन मिळत याची माहिती त्यांना मिळते. रिपोर्टनुसार, दुबईत सध्या आयफोनचे नवे मॉडल 28 हजार रुपयांनी स्वस्त विकले जात आहे. आता लोक दुबईत फोनची जी किंमत आहे, त्याला भारतीय पैशात रुपांतरीत करून किती फरक आहे याचा अंदाज घेत आहेत. त्यामुळेच गुगलमध्ये हे नंबर सर्चिंगमध्ये आले आहेत.

दुबईत आयफोन कितीला?

अ‍ॅपलच्या यूएई स्टोअरच्या मते, आयफोन 18 प्रोच्या 256 जीबी मॉडलची किमत 5,099 AED, 512GB ची 5,949 AED, 1TB ची 7,649 AED आणि 2TB ची 10,199 AED आहे. तसेच आयफोन 18 प्रो मॅक्सच्या 256GBची किंमत 5,499 AED, 512GB ची 6,349 AED, 1TB ची 8,049 AED आणि 2TB ची 10,599 AED आहे. त्यामुळेच गुगलवर सध्या 5499, 5099, 5949 आणि 6349 सारखे नंबर एकसाथ ट्रेंड करत आहेत.

Follow Us
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक