8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले, एरिअरचे 18 लाख मिळणार
8th Pay Commission arrears : 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत असणार्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी वार्ता समोर आली आहे. एका दाव्यानुसार, 2.57 फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याची शक्यता आहे. तर त्याआधारे एरिअरची चर्चा सुरू झाली आहे.

केंद्र सरकारचे कर्मचारी 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. आयोगाचे सदस्य विविध मोठ्या शहरात बैठका आयोजित करत आहेत. तिथे विविध विभागाच्या कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि निवृत्ती वेतनधारकांनी मागण्या सादर केल्या आहेत. याविषयीचे निवेदनही दिले आहे. त्यातील किती मागण्या मान्य होतात, ते शिफारशी समोर आल्यानंतर समजेल. दरम्यान एका दाव्यानुसार, 2.57 फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याची शक्यता आहे. तर त्याआधारे एरिअरची चर्चा सुरू झाली आहे.
2.57 फिटमेंट फॅक्टरची चर्चा
सध्या फिटमेंट फॅक्टर किती असेल याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक कर्मचारी संघटनांनी जादा फिटमेंट फॅक्टरची आणि कुटुंबाची व्याख्या बदलण्याची मागणी केली आहे. पाच सदस्यीय कुटुंबाची अथवा त्यापेक्षा अधिकची मागणी केली आहे. दरम्यान 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
किती मिळेल एरिअर, थकबाकी?
8 व्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. त्यानुसार, नवीन वेतन आयोग लागू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना जुन्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल. या दरम्यान फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल. 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार, 8 व्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना जवळपास 18 लाख रुपयांपर्यंत थकबाकी, एरिअर मिळेल. अहवाल लागू होण्यासाठी अजून 20-24 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सध्याचे 47,600 रुपये हे मूळ वेतन वाढून 1,22,332 रुपये होईल. हातातील पगार 74,732 रुपये असेल. नवीन वेतन आयोग लागू होण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याआधारे या कर्मचाऱ्यांना 17,93,568 रुपयांची वेतन थकबाकी मिळेल.
वेतन थकबाकी म्हणजे काय?
नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर दोन वेतन श्रेणीतील जी फरकाची रक्कम कर्मचार्यांसाठी देय असते. कर्मचाऱ्याचा पूर्वीच्या काळात केलेल्या कामाचा असा पगार, वाढीव रक्कम, जी त्यावेळी देणे बाकी होती. पण ती वेळेवर देण्यात आली नाही. तिला वेतन थकबाकी, एरिअर असे म्हणतात. विलंबानंतर एकदाच रक्कम कर्मचार्यांच्या खात्यात जमा होते. नवीन वेतन आयोग लागू होण्यासाठी जितका अधिक कालावधी लागेल, तितके एरिअर अधिक असेल.
