अमिताभ बच्चन यांना शेअर बाजारात जॅकपॉट; 1.64 कोटी कमावले एकाच दिवसात, या छोटूरामची कमाल
Amitabh Bachchan Share Market: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना स्टॉक मार्केटमध्ये या शेअरने जॅकपॉट लावला. त्यांनी एकाच दिवसात 1.64 कोटी कमावले. तेव्हापासून या स्टॉकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोणता आहे हा शेअर?

Amitabh Bachchan DP Wires Company Stock: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे केवळ पडद्यावरच नाही तर शेअर बाजारातही कमाल दाखवत आहेत. त्यांचा पोर्टफोलिओ आता चर्चेत आला आहे. प्लास्टिक पाईप आणि स्टील वायर करणारी कंपनी डीपी वायर्सच्या (DP Wires) शेअर्सनी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मंगळवारी मोठी कमाल केली. 23 जून रोजी अवघ्या काही तासात त्यांनी 1.64 कोटी रुपयांची मोठी कमाई केली. ही बातमी समोर येताच या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. कालपरवा बीएसईवर (BSE) या शेअरमध्ये 4.42 टक्क्यांची तेजी दिसून आली होती. हा शेअर 212.60 रुपयांवर पोहचला होता. तर आज दुपारी या शेअरने पुन्हा 3.07 टक्क्यांची भरारी घेतली हा शेअर 216.92 रुपयांवर पोहचला आहे.
अमिताभ बच्चन यांचा पोर्टफोलिओ चर्चेत
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील (NSE) आकडेवारीने अमिताभ बच्चन यांचा पोर्टफोलिओ चर्चेत आला. अमिताभ बच्चन यांनी डीपी वायर्सचे 1,23,622 शेअर्स 200.84 रुपयांवर विक्री केले. तर 41,566 शेअर्स 199.90 रुपये प्रति शेअर भावाने खरेदी सुद्धा केले. त्यांनी एकूण 82,056 शेअर्स विक्रीतून एका झटक्यात 1.64 कोटी रुपयांची कमाई केली. त्यांचा या कंपनीवर विश्वास असल्याचे यापूर्वी सुद्धा दिसून आले. मार्च 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीत शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्या पोर्टफोलिओत डीपी वायर्सचे अगोदरच 3,27,590 शेअर आहेत. या कंपनीत त्यांचा एकूण 2.11 टक्के वाटा आहे.
सामान्य गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास
कोणताही शेअर किती दमदार आहे हे त्याच्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या खरेदी-विक्रीवरून दिसून येते. डीपी वायर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर लक्ष दिले तर लोकांचा वाटा 25.22 टक्के इतका आहे. म्युच्युअल फंड असो वा विमा कंपन्याचा यात वाटा नाही. बाजारात दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करणारे जवळपास 20,979 छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यांनी या कंपनीचे 28,87,608 शेअर डीमॅट खात्यात सुरक्षित आहे. कंपनीच्या एकूण गुंतवणूकीत हा वाटा 18.63 टक्के इतका आहे. याचा अर्थ किरकोळ गुंतवणूकदारांचा या स्टॉकवर चांगला विश्वास आहे.
या स्टॉकचा रेकॉर्ड कसा?
या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे याची चर्चा होत आहे. आर्थिक वर्ष 2026 मधील मार्च तिमाहीचा महसूल वार्षिक आधारावर 6.28 टक्क्यांवरून घसरून 129.01 कोटी रुपये इतका आला आहे. तर कंपनीने निव्वळ नफ्यात मोठी झेप घेतली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 132.60 टक्क्यांची वाढ होऊन 9.39 कोटी रुपयांवर पोहचली आहे. बाजारात या शेअरमध्ये मोठा चढउतार दिसून आला आहे. गेल्या वर्षी 8 सप्टेंबर 2025 रोजी हा स्टॉक 306.10 रुपयांची उच्चांकी झेप दिसून आली आहे. तर गेल्या 6 महिन्यात या शेअरमध्ये मोठी विक्री दिसली. 2 मार्च 2026 रोजी या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. हा शेअर 60.14 टक्क्यांनी घसरून 122 रुपयांच्या निच्चांकावर आला होता.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. ही केवळ माहिती आहे. कुठल्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.