Adani Share : अदानी ही कंपनी विकणार, शेअर घसरला..तुम्ही तर गुंतवणूक केली नाही ना ?

Adani Share : अदानी समूह त्यांची ही कंपनी विक्री करणार आहे, या कंपनीत तर तुम्ही गुंतवणूक केली नाही ना..

Adani Share : अदानी ही कंपनी विकणार, शेअर घसरला..तुम्ही तर गुंतवणूक केली नाही ना ?
या कंपनीची विक्री
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 11, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली : अदानी समूह (Adani Group) लवकरच त्यांच्या उपकंपनीतील (Subsidiary) संपूर्ण हिस्सा विक्री करत आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये (Share) घसरण झाली आहे. पण गुंतवणूकदारांना (Investor) या विक्रीतून नुकसान होणार नाही. कारण समूहातंर्गतच ही खरेदी-विक्री करण्यात येणार आहे.

अदानी पॉवर लिमिटेड (APL) ची उपकंपनी सपोर्ट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (SPPL) मधील सर्व हिस्सा Adaniconex प्रायव्हेट लिमिटेड (ACX) या कंपनीला विक्री करत आहेत. 1,556.5 कोटी रुपयांना हा व्यवहार होत आहे.

अदानी पॉवर लिमिटेडने 10 नोव्हेंबर रोजी या खरेदी-विक्रीची माहिती दिली. या बातमीचा शेअर बाजारात तात्काळ परिणाम दिसून आला. अदानी पॉवरचा शेअर 1% घसरला. त्यामुळे हा शेअर 368 रुपयांवर आला आहे.

या कराराची प्रत अदानी पॉवरने स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. त्यामध्ये अदानी पॉवरची पूर्ण स्वामित्व असणारी उपकंपनी सपोर्ट प्रॉपर्टीज प्रायवेट लिमिटेडची 100% इक्विटी हिस्सा अडानीकोनेक्स प्रायवेट लिमिटेडला विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हा करार 1,556.5 कोटी रुपयांचा असेल. यामध्ये समूहातंर्गत दोन कंपन्यामध्ये व्यवहार होत आहे. एका उपकंपनीतील संपूर्ण हिस्सा दुसऱ्या कंपनीला विक्री करण्यात येत आहे. हा व्यवहार येत्या जानेवारी 2023 च्या अखेरीस पूर्ण होईल.

अदानी पॉवरचे शेअरने गेल्या पाच दिवसांच्या व्यापारी सत्रात जोरदार कामगिरी बजावली आहे. हा शेअर या पाच दिवसांत 11% टक्क्यांनी वधरला. या वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना 263.38% परतावा दिला आहे.

या शेअरने रॉकेट भरारी घेतली आहे. 101 रुपयांवरुन हा शेअर 368 रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. हा शेअर गेल्या एका वर्षात 240.52% वधरला आहे.