Business : कर्जात डुबलेल्या कंपनीसाठी अंबानी-अदानी समूहात रस्सीखेच, कोणती आहे ही कंपनी?

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

Updated on: Nov 11, 2022 | 4:01 PM

Business : कर्जबाजारी कंपनीसाठी अंबानी-अदानी समूहात रस्सीखेच सुरु आहे..

Business : कर्जात डुबलेल्या कंपनीसाठी अंबानी-अदानी समूहात रस्सीखेच, कोणती आहे ही कंपनी?
अंबानी-अदानीमध्ये रस्सीखेच
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : कर्जबाजारी कंपनी (Debenture Company) खरेदी करण्यासाठी भारतातील दोन दिग्गज उद्योग समूह (Business Group)आमने-सामने आले आहेत. केवळे हे दोघेच नाही तर इतरही ग्रुप ही कंपनी खरेदी करण्यासाठी इच्छूक आहे. जवळपास 15 कंपन्यांनी खरेदीसाठी बोली (Bid) लावली आहे.

ही कंपनी किशोर बियानी (Kishore Biyani) यांचा फ्यूचर ग्रुप (Future group) आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. हा शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रात जवळपास 5% वधरला आणि 3.83 रुपयांवर पोहचला.

गेल्या महिन्यातच फ्यूचर रिटेलची ट्रेडिंग (Future retail trading) बंद करण्यात आली आहे. कंपनीचं दिवाळं निघाले आहे. तरीही ही कंपनी खरेदी करण्यासाठी अनेक उद्योग समूह समोर आले आहेत. त्यात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी
(Gautam Adani) यांचा ही समावेश आहे.

ही कंपनी खरेदी करण्यासाठी 15 जण शर्यतीत आहे. त्यांनी कंपनी खरेदीसाठी बोली लावली आहे. फ्यूचर रिटेलचा ताबा मिळविण्यासाठी या कंपन्यांनी त्यांचे अधिकारपत्र (EoI) , स्वारस्य दाखविले आहे.

हा ग्रुप ताब्यात घेण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यामध्ये कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज, ओपी जिंदाल ग्रुपच्या नलवा स्टील अँड पॉवर, शालिमार कॉर्पोरेशनसह इतर कंपन्यांचा समावेश आहे.

दिवाळं निघाल्याने फ्यूचर ग्रुपचे शेअर 10 ऑक्टोबरपासून BSE-NSE वर व्यापार करत नाहीत. या शेअरची ट्रेडिंग बंद आहे. फ्यूचर रिटेलचा शेअर सर्वात शेवटी 3.60 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरने गुंतवणूकदारांना 92% नुकसानीचा झटका दिला आहे.

हे सुद्धा वाचा

या कंपनीचे दिवाळे निघाल्याने तिचे बाजारातून डि-लिस्टिंग प्रक्रिया सुरु आहे. जेव्हा एखादी कंपनीचे विलिनीकरण, पूनर्गठन वा विस्तार होत असेल. कंपनी नियमांचे पालन करत नसेल तर ही प्रक्रिया राबविण्यात येते. सध्या कंपनीच्या ट्रेडिंगवर बंदी आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI