AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल

Oakley Meta Vanguard स्मार्ट ग्लास भारतात लाँच झाला आहे.यात Meta AI सपोर्ट, 12MP कॅमेरा आणि स्पोर्ट्स-फ्रेंडली डिझाईन मिळते.याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहूयात...

Oakley Meta Vanguard: स्मार्टफोनची कामे करेल हा चष्मा, फिचर्स पाहाल तर धक्का बसेल
Oakley Meta Vanguard
| Updated on: Feb 03, 2026 | 9:55 PM
Share

Meta आणि Oakley मिळून भारतात नवा Oakley Meta Vanguard स्मार्ट ग्लास लाँच केला आहे. स्मार्ट ग्लास खास करुन एथलीट आणि आऊटडोर युजर्ससाठी तयार केला आहे. हा Ray-Ban Meta ग्लासचा नवा स्पोर्ट्स व्हर्जन मानला जात आहे. यात 12 मेगा पिक्सेल कॅमरा, फुल HD व्हिडियो रेकॉर्डिंग आणि मेटा एआय इंटिग्रेशन मिळतो.युजर या ग्लासने फोटो, व्हिडीओ, कॉल आणि AI असिस्टन्टचा वापर करु शकतो. हिंदी भाषा आणि UPI Lite सपोर्ट सारखा इंडिया-फोकस फिचर जोडण्यात आले आहेत.

किंमत, व्हेरिएंट आणि उपलब्धता

Oakley Meta Vanguard ची सुरुवातीची किंमत 52,300 रुपये ठेवली आहे. हा स्मार्ट ग्लास Sunglass Hut, LensCrafters आणि देशभरातील प्रमुख ऑप्टिकल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. भारतात याची सुरुवाती किंमत 52,300 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यात विविध Prizm लेन्सचे ऑप्शन दिले आहेत. Black आणि White फ्रेमसोबत Prizm 24K, Prizm Black, Prizm Road आणि Prizm Sapphire लेन्स सारखे पर्याय मिळतात. हे प्रोडक्ट प्रीमीयम सेगमेंट युजर्स आणि स्पोर्ट्स लव्हर्सना धान्यात घेऊन तयार केले आहेत.

स्पोर्ट्स डिझाईन आणि मजबूत बिल्ड

Oakley Meta Vanguard ला खास पद्धतीने हाय-इंटेंसिटी आऊटडोर स्पोर्ट्स आणि सायक्लिगंसाठी डिझाईन केले आहे. याचे रॅपअराऊंड डिझाईन डोळ्यांना चांगले कव्हरेज आणि प्रोटेक्शन देते. याचे वजन केवळ 66 ग्रॅम आहे. त्यामुळे बराच काळ डोळ्यांवर ठेवल्याने त्रास होत नाही. यास IP67 रेटिंग मिळाली आहे. म्हणजेच धुळ आणि पाण्यापासून हा ग्लास संपूर्ण सुरक्षित आहे. Prizm लेंस टेक्नोलॉजी ऊन, हवा आणि धुळीचा परिणाम करण्यासाठी देण्यात आली आहे.ज्यामुळे आऊटडोअर व्हिजीबिलीटीसाठी चांगली रहाते.

कॅमरा, ऑडिओ आणि कंट्रोल फिचर्स

या स्मार्ट ग्लासच्या सेंटरला मध्यभागी 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो 122 डिग्री फील्ड ऑफ व्यूसोबत फर्स्ट पर्सन व्यू रेकॉर्डिंग करतो. चष्म्याच्या मदतीने युजर 1080p व्हिडियो 30fps वर पाच मिनिटांपर्यंत आणि 60fps वर तीन मिनिटांपर्यंत रेकॉर्डिंग करु शकतो. यात 3K रिझोल्यूशनवर मर्यादित प्रमाणात रेकॉर्डिंग शक्य आहे.ज्यास Facebook आणि Instagram सारख्या Meta एप्सवर शेअर करता येतो. यास ओपन इयर स्पीकर आणि पाच मायक्रोफोनचा सेटअप आहे.यात नवीन एक्शन बटण आणि कस्टम बटण कॅमेरा आणि मोड कंट्रोल सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Meta AI, हिंदी सपोर्ट आणि बॅटरी

Oakley Meta Vanguard मध्ये Meta AI इंटीग्रेशन दिले आहे. ज्यास Hey Meta AI बोलून अक्टीव्ह केले जाऊ शकते. युजर गाणे ओळखणे, प्रश्न विचारणे, मॅसेज वाचणे आणि मीडिया कंट्रोल सारखी काम वॉईसने करु शकतात. भारतासाठी हिंदी भाषा सपोर्ट, हिंदी वॉईस इंटरॅक्शन आणि UPI Lite पेमेंट कंट्रोल देखील जोडण्यात आले आहे. AI वॉईस ऑप्शनमध्ये दीपिका पादुकोण हिचा आवाज सामील केला आहे. कनेक्टिविटीसाठी Bluetooth 5.3 आणि Wi-Fi 6E सपोर्ट मिळतो. डिव्हाईसमध्ये 32GB स्टोरेज आहे, बॅटरी लाईफ सामान्य उपयोगात नऊ तास आणि चार्जिंग केससोबत एकूण 36 तास वापरता येते.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....