AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Meta Connect 2024 : मार्क झुकरबर्ग यांच्या Meta चा धडाका, एकाच वेळी तीन प्रोडक्ट लॉंच केले

फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा Meta ने दोन दिवसीय इव्हेंट Meta Connect 2024 चे आयोजन केले होते. यात कंपनीने सर्वात एडव्हास असा Orion ग्लासेस सादर केला आहे. हा तुम्हाला Apple Vision Pro ची देखील आठवण करुन देऊ शकतो. चला तर या नवीन प्रगत प्रोडक्टबद्दल जाणून घेऊयात...

Meta Connect 2024 : मार्क झुकरबर्ग यांच्या Meta चा धडाका, एकाच वेळी तीन प्रोडक्ट लॉंच केले
| Updated on: Sep 26, 2024 | 10:16 PM
Share

फेसबुकची पेरेंट कंपनी मेटाच्या वतीने दोन दिवसीय सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. मेटा कनेक्ट 2024 च्या या सोहळ्यात भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने ओरियन ( Orion ) ची घोषणा केली आहे. हे एक सर्वात एडव्हान्स ग्लास आहे. अनेक दृष्टीने हे आपल्याला Apple Vision Pro सारखे देखील वाटू शकते. मेटा कंपनीने याशिवाय देखील अनेक प्रोडक्ट लॉंच केले आहेत. यात न्यू एंट्री लेव्हल VR हेडसेट Quest 3S, Ray-Ban Meta Smart Glasses आणि Meta AI मध्ये नवीन फिचर्सची घोषणा यांचा समावेश आहे. यासंबंधीत डिटेल्स पाहूयात…

Meta चा नवीन Quest 3S ला लॉन्च केले आहे, हा एक बजट VR हेडसेट आहे. याची किंमत 299 अमेरिकन डॉलर असून तो Quest 2 ला रिप्लेस करणार आहे. यात यूजर्सना न्यू बॉक्सी आणि बग सारखा लुक मिळणार आहे.

ऐप्स चालवा आणि भन्नाट गेम्स खेळा

यात Qualcomm Snapdragon XR2 chip मिळणार आहे, यात अनेक ऐप्स आणि गेम्सचे एक्सेस मिळणार आहे. मिक्स्ड रिएलिटी एक्सपीरियंससाठी यात काही कॅमेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात टच कंट्रोल्स देखील असणार आहे.

मेटाने अखेर अनेक दिवसांनंतर आपल्या Augmented Reality Glasses लॉंच केले आहे. याचं नावच Orion असे देण्यात आले आहे. यात होलोग्राफीक डिस्प्ले देण्यात आला आहे. हा ग्लासेस घालून हॅंड जेस्चर फिचर्स कंट्रोल केले जाऊ शकते. यासाठी न्यू EMG wristband ला हातात घालावे लागेल.

Meta AI मध्ये नवीन फीचर्स

Meta आपल्या ओपेन सोर्स AI मॉडल आणि Meta AI ला अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. याला अपडेट केल्यानंतर Meta AI मध्ये नवीन फीचर्स पाहायला मिळते. यानंतर Meta AI चे फोटो अपलोड केल्यानंतर त्यानंतर एडिट कमांड देऊ शकतो. Meta AI मध्ये वॉईस सपोर्ट देखील मिळणार आहे. यामुळे यूजर्सच्या आवाज आणि आर्टिफिशियल व्हॉईसला देखील सपोर्ट करणार आहे.

Quest Headsets मध्ये एक्टर्नल डिस्प्लेचा सपोर्ट

Quest Headsets हे वास्तविक Apple Vision Pro च्या वैशिष्ट्यांनी प्रेरीत झालेले गॅझेट वाटत आहे. Quest Headsets मध्ये नवीन अपडेट मिळणार आहे.याच्या मदतीने Quest Headsets ला केवळ कीबोर्ड पाहून विंडोज लॅपटॉपशी कनेक्ट केले जाऊ सकते.यासाठी व्हर्जुअली पेयरिंग बटणला दाबावे लागणार आहे.

यानंतर लागलीच व्हर्च्युअल मॉनिटर तयार होईल, ज्याला यूजर्स सोप्या मार्गाने क्रिएट करु शकतील आणि संपूर्ण घरात फिरुन त्याचा वापर करु शकणार आहेत.Quest Headsets आधीपासून PC च्या एक्स्ट्रा मॉनिटरसारखे काम करतो. ज्याला वायरलेस आणि HDMI कनेक्शन द्यावे लागते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.