Adani 2nd richest : आता फक्त एलन मस्कलाच ओव्हरटेक करणं बाकी! श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी नंबर दोनवर
गौतम अदानी (gautam adani news) यांना पहिलं स्थान गाठण्यासाठी एलन मस्क यांना मागे टाकावं लागेल. गौतम अदानी बर्नाड अर्नाल्ट यांना मागे टाकलं आणि दुसरं स्थान पटकावलंय. तर बर्नार्ड हे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (worlds richest people) जगात तिसऱ्या स्थानी आहेत.

श्रीमंतीची हनुमान उडी
Image Credit source: सोशल मीडिया
मुंबई : जगातील श्रीमंतांच्या यादीत (latest richest man in the world) गौतम अदानी हे आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. एलन मस्कनंतर आता गौतम अदानी यांचा नंबर लागलाय. त्यामुळे गौतम अदानी (gautam adani news) यांना पहिलं स्थान गाठण्यासाठी एलन मस्क यांना मागे टाकावं लागेल. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत गौतम अदानी यांनी दुसऱ्या स्थानी झेप घेतल्याचं समोर आलंय.