शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

NSDLकडून काही दिवसांपूर्वी Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड और APMS इनवेस्टमेंट फंड ही तीन अकाऊंटसमधील व्यवहार तातडीने बंद करण्यात आले होते.

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 3:51 PM

मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेकडून (NSDL) नुकतीच तीन परदेशी गुंतवणूकदारांवर कारवाई केली. NSDL ने सील केलेली या तीन फंडांच्या अकाऊंटसमधून अदानी ग्रूपच्या (Adani Group) कंपन्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईनंतर अदानी ग्रूपच्या समभागांचे (Share) भाव खाली कोसळले आहेत. (NSDL freeze three fpi accounts owing adani group shares)

प्राथमिक माहितीनुसार, NSDLकडून काही दिवसांपूर्वी Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड और APMS इनवेस्टमेंट फंड ही तीन अकाऊंटसमधील व्यवहार तातडीने बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. विशेषत: अदानी समूहातील कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.

अदानी एन्टरप्रायजेसचा समभाग 15 टक्क्यांनी घसरुन त्याची किंमत 1361.25 इतकी झाली. तर अदानी पोर्टस अँण्ड इकोनॉमिक झोन कंपनीचा शेअर 14 टक्क्यांनी खाली पडला. अदानी पॉवर 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन 5 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा समभागाची किंमतही पाच टक्क्यांनी खाली आली.

कारवाईचे नेमके कारण काय?

Albula इनवेस्टमेंट फंड, Cresta फंड और APMS इनवेस्टमेंट फंड यांच्याकडून मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न देण्यात आल्यामुळे NSDLकडून त्यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात येते. खाती फ्रीज झाल्यामुळे आता या तिन्ही फंडसना समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) या तिन्ही फंडसकडून पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. यासाठी नोटीसही पाठवण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणतेही स्पष्टीकरण न आल्याने NSDLकडून ही खाती फ्रीज करण्यात आली.

इतर बातम्या:

अदानी ग्रुपचं मोठं पाऊल, 48 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार!

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

अदानी ग्रुपवर 17 अब्ज डॉलरचं कर्ज, तरीही गौतम अदानी 2.3 लाख कोटींचे मालक कसे? जाणून घ्या…

(NSDL freeze three fpi accounts owing adani group shares)