Elon Musk : मालक झाल्यानंतर ‘इलॉन मस्क’ ने केलीय ‘ट्विटर’ चीच छेड काढायला सुरुवात!

| Updated on: Apr 27, 2022 | 10:04 PM

इलॉन मस्कने जे करतो ते अंतरगीच असते असा समज आता प्रचलीत झाला आहे. त्याने, पुन्हा अशीच काही गोष्ट केली असून, स्वतःत विकत घेतलेल्या टिविट्ररचीच छेड काढालया सुरूवात केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

Elon Musk : मालक झाल्यानंतर ‘इलॉन मस्क’ ने केलीय ‘ट्विटर’ चीच छेड काढायला सुरुवात!
एलॉन मस्क
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी, ट्विटरचा मालक झालेले, इलॉन मस्क हे स्वत: एका अॅपचा मालक झाले आहे. पण, दुसऱ्या अॅपचा प्रचार करत आहे. होय, हा विनोद नसून वस्तुस्थिती आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करून सांगितले की, अॅपलच्या अॅप स्टोअरवर ट्रुथ सोशल अॅप (Truth Social App) नावाचे अॅप डाउनलोडमध्ये ट्विटर आणि टिकटॉकला (Twitter and TickTalk) मागे टाकत आहे. तुम्हाला वाटेल की, एलोन मस्कची ही नवीन युक्ती असेल, किंवा तो आता नवीन अॅप खरेदी करत असेल. परंतु तसे काहीही नाही. सोमवारी ट्विटरचे अधिग्रहण करण्यापूर्वी (Before acquisition), ट्रुथ सोशल अॅप स्टोअरवर विनामूल्य अॅप श्रेणीमध्ये 52 व्या क्रमांकावर आणि ट्विटरवर 39 व्या क्रमांकावर होता. इथे अधिग्रहण झाले तर दुसरीकडे, सोशल मिडीयावर ट्रुथ सोशल अॅप ट्विटर आणि टिकटॉकच्या पुढे गेले. डोनाल्ड ट्रम्पचे ट्रुथ सोशल अॅप सध्या ऍपल स्टोअरच्या चार्टमध्ये अव्वल आहे. अलीकडेच ट्विटर हे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकत घेतलेल्या इलॉन मस्कने या संदर्भात एक छायाचित्र शेअर केले आहे. ज्यामध्ये ‘ट्रुथ सोशल’ अॅप टॉपवर असल्याचे दिसून येते. त्यानंतर ट्विटर आणि ट्विटरचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी यूएस संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे अॅप लाँच केले.

रिपोर्ट काय म्हणतो..

रिपोर्ट्सनुसार, डीलपूर्वी, ट्रुथ सोशल चार्टवर 52 व्या स्थानावर होते. तर ट्विटर 39 व्या स्थानावर होते. 18 ते 25 एप्रिल दरम्यान, ट्रम्पच्या ट्रुथ सोशलचे डाउनलोड्स आठवड्यात 75,000 पर्यंत पोहोचले, 150% वाढ नोंदवली. ट्रम्पचे ट्रुथ सोशल या वर्षी फेब्रुवारीमध्ये लॉंच झाल्यापासून सुमारे 1.4 दशलक्ष वेळा डाउनलोड केले गेले आहे. भारतीय बाजारात अॅपल स्टोअरवर हे अॅप अद्याप उपलब्ध नाही. तथापि, ते Android फोनसाठी Google Play Store वर मात्र उपलब्ध आहे. मात्र, आपण ट्विटरवर परतणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कंपनी ताब्यात घेतल्यानंतर इलॉन मस्क यांचे खाते पूर्ववत झाले तरी ट्रुथ सोशल अॅपवर राहील, असे ते म्हणाले.

“फ्री स्पीच” चे समर्थन

यंदा वर्षी 6 जानेवारी रोजी कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली तेव्हा त्यांनी स्वतःचे अॅप आणण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे अॅप “फ्री स्पीच” चे समर्थन करते. ट्रुथ सोशल या वर्षी मार्चपासून पूर्णपणे काम करणार होते, परंतु एप्रिल महिन्यातही लाखो लोक ते डाउनलोड करू शकले नाहीत. सर्वसामान्यांसाठी अॅपची प्रतीक्षा यादी लांबत चालली होती. फोर्ब्सच्या बातमीनुसार, 11-18 एप्रिलच्या आठवड्यात अॅपचे एकूण डाउनलोड 97 टक्क्यांनी कमी झाले. स्पष्टपणे सांगायचे तर, स्थिती बिकट होती. पण एप्रिलमध्ये अब्जाधीश एलोन मस्क यांनी ट्विटर विकत घेतील. त्याने ट्विटरचे 9.2% शेअर्स आधीच विकत घेतले होते, पण त्याने बोर्डात सामील न होऊन सर्वांना चकित केले होते. या गोंधळाचा फायदा टूर्थ सोशल अॅपला मिळाला. अवघ्या एका आठवड्यात 75000 लोकांनी ते डाउनलोड केले आहे.

इतर बातम्या :

Elon buy twitter : एलन मस्क ट्विटरचे मालक बनताच क्वईन लॉंच, लगेच वाढली 7 हजार टक्क्यांनी किंमत, हा घोटाळा तर नाही ना?

Elon Musk Twitter Share Price : 3 अब्ज डॉलर कॅश शिल्लक! 44 अब्ज डॉलरची जमवाजमव करण्यासाठी काय रणनिती?

French election : इम्यॅनुएल मॅक्रॉन हेच फ्रान्सचे नवे कारभारी, सलग दुसऱ्यांदा विजय; मरीन ले पेन यांचा पराभव