हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये किती झाली घसरण

| Updated on: Feb 24, 2023 | 3:44 PM

अदानी समूहाच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप एका महिन्यात 62 टक्क्यांनी खाली येऊन 7.32 लाख कोटी रुपयांवर आले आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समुहाचे शेअर ओव्हरड्यू असल्याचे म्हटले होते.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये किती झाली घसरण
कधी संपणार साडेसाती
Follow us on

नवी दिल्ली : महिन्याभरापुर्वी म्हणजेच 24 जानेवारी रोजी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या आयुष्यात वादळ आले. हे वादळ अजून ही शमले नाही. केवळ एका अहवालाने अदानी यांचे साम्राज्य हादरले आहे. अमेरिकन संशोधन फर्म हिंडनबर्गच्या अहवालाने (Hindenburg Report) अदानी समूहाची मोठी पडझड केली आहे. एका महिन्यात 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समूहाच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप एका महिन्यात 62 टक्क्यांनी खाली येऊन 7.32 लाख कोटी रुपयांवर आले आहे. हिंडनबर्गच्या अहवालात अदानी समुहाचे शेअर ओव्हरड्यू असल्याचे म्हटले होते.

अमेरिकन संशोधन कंपनी हिंडनबर्गने अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी ग्रुपवर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉडसह अनेक गंभीर आरोप केले होते. अहवाल आल्यानंतर, अदानीचे शेअर्स घसरत राहिले आणि एका महिन्यात 80% पेक्षा जास्त घसरले.

अदानी समुहाचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून नीच्चांकावर आले आहे. शेअरमध्ये घसरण अजूनही सुरु आहे. शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी देखील अदानी यांचे बहुतांश शेअर्स लोअर सर्किटमध्ये होते.

हे सुद्धा वाचा

12 लाख कोटी रुपयांचे नुकसान


हिंडेनबर्ग रिसर्चच्या एका अहवालात केवळ एका महिन्यात अदानी गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी समूहाच्या शेअर्सचे एकूण मार्केट कॅप एका महिन्यात 62 टक्क्यांनी खाली येऊन 7.32 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

महिन्याभरापुर्वी काय झाले

24 जानेवारी 2023 रोजी, अमेरिकेच्या शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानीबद्दल 106 पानांचा अहवाल जारी केला. यानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांबाबत जगाचा दृष्टिकोनच बदलला. समूहाच्या शेअर्समध्येही वादळ आले. या अहवालामुळेच गौतम अदानी यांची वैयक्तिक संपत्तीही बुडाली. महिन्याभरापूर्वी जगातील टॉप 3 श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत असलेले गौतम अदानी आता जगातील टॉप 25 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

 77 अब्ज डॉलरचे नुकसान

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीत गौतम अदानी यांनी सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. या काळात अदानी यांचे 77 अब्ज डॉलर स्वाहा झाले आहेत.  24 जानेवारीपासून अदानी समूहासाठी एकच बाब दिलासादायक ठरली आहे, ती म्हणजे भारतीय रेटिंग एजन्सीजीने अद्याप या कंपन्यांचे मानांकन कमी केलेल नाही. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. परंतु गौतम अदानी आणि अदानी समूहाची सध्याची परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारही चिंतेत पडले आहेत. गेल्या एका महिन्यात त्यांची कमाईही झरझर खाली आली आहे.