महागाईचा आणखी एक झटका; ‘उबेर’ नंतर आता ‘ओला’नेही वाढवले भाडे; भाड्यात 16 टक्क्यांपर्यंत वाढ

| Updated on: Apr 13, 2022 | 3:02 PM

महागाईचा आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उबेर नंतर (Uber Cabs) आता ओला कंपनीने देखील आपल्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली आहे. ओलाकडून भाडेवाढीची घोषणा करण्यात आली आहे.

महागाईचा आणखी एक झटका; उबेर नंतर आता ओलानेही वाढवले भाडे; भाड्यात 16 टक्क्यांपर्यंत वाढ
Follow us on

देशात महागाईने (Inflation) नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल (Petrol), डिझेल, सीएनजी, एलपीजी, पीएनजी अशा सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत. जीवानावश्यक वस्तू देखील महाग झाल्या आहेत. सर्व सामान्याचे बजेट कोलमडल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीमध्ये महागाईचा आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उबेर नंतर (Uber Cabs) आता ओला कंपनीने देखील आपल्या प्रवासी भाड्यामध्ये वाढ केली आहे. ओलाकडून भाडेवाढीची घोषणा करण्यात आली आहे. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ओलाने आपल्या भाड्याचे दर वाढवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार ओलाने हैदराबादमध्ये मिनी आणि प्राइम कॅब सेवेच्या भाड्यात वाढ केली आहे. ओलाकडून भाड्यामध्ये 16 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओलाच्या चालकांकडून भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात येत होती. इंधनाच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाल्याने त्यांचे मार्जीन कमी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर ओलाने भाडेवाढीचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

इंधनांच्या महागाईमुळे भाडेवाढीचा निर्णय

अमेरिकन कंपनी असलेल्या उबेरने काही दिवसांपूर्वी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये आपले भाडे वाढवले होते. भाड्यामध्ये 12 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तर मुंबई आणि हैदराबादमध्ये भाड्यात 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. भाडेवाढीबाबत बोलताना उबेरच्या एका अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले होते की, इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इंधनाचे रेट वाढल्याने याचा थेट फटका हा आमच्यासोबत काम करणाऱ्या चालकांना बसत आहे. त्यांच्या मार्जीनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भाडे वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर कंपनीने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला, उबेर पाठोपाठ इंधन महागल्याने ओलाकडून देखील आता भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील टॅक्सी चालकांकडून भाडेवाढीची मागणी

ओला, उबेरच नाही तर मुंबईतील टॅक्सी चालकांनी देखील भाडेवाढीची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सीएनजीच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भाडेवाढीच्या नियमाप्रमाणे जर सीएनजीचे दर हे 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले तर टॅक्सीचे भाडे देखील वाढते. मात्र टॅक्सी भाड्यात शेवटची दरवाढ झाल्यापासून सीएनजीचे दर तब्बल 35 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे आता तरी टॅक्सी भाड्यात वाढ करावी अशी मागमी टॅक्सी चालकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

शेअर बाजारात तेजी; सेंसेक्समध्ये 350 अंकांची वाढ, टाटा स्टील टॉप गेनवर

महागाईचा कहर! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, FMCG वस्तूंच्या खरेदीत घसरण

LIC IPO या महिन्याच्या शेवटी गाठणार मुहूर्त; 12 मेपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता