
एकीकडे अब्जाधीश इलॉन मस्क यांची इलेक्ट्रीक कार कंपनी टेस्लाने भारतात आपले शोरुम उघडण्याची प्रक्रीया वेगवान केली आहे. तर दुसरीकडे इलॉन मस्क यांच्या Starlink चे वेगवान इंटरनेट अखेर भारतात सुरु होण्याची दाट शक्यता आहे. आता एअरटेलने घोषणा केली आहे की इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीसोबत एक करार केल्यामुळे स्टारलिंकची सेवा भारतात उपलब्ध होणार आहे.
एअरटेल आणि स्टारलिंक यांच्यावतीने एक जॉईंट स्टेटमेंट जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही कंपन्यांनी ११ मार्च रोजी अधिकृतरित्या डीलवर सह्या केल्या आहेत. सर्व मंजूरी मिळाल्यानंतर एअरटेल भारतात स्टारलिंकची सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरु करु शकणार आहे.भारतात स्टारलिंकची ही पहिली पार्टनरशिप आहे. एअरटेलने देशभर कंपनी आपल्या स्टोअरमधून स्टारलिंकची सर्व्हीस ऑफर करणार आहे. यात स्टारलिंकचा डीव्हाईसचा देखील समावेश असणार आहे.
एअरटेलने म्हटले आहे की त्यांचा इयूटेलसॅटच्या वनवेब सोबत आधीच पार्टनरशिप केली आहे. या नव्या पार्टनरशिपने एअरटेल ग्राहकांना ज्यादा पर्याय उपलब्ध करणार आहे. खासकरुन अशा विभागात सर्व्हीस उपयुक्त होणार आहे. जेथे आता इंटरनेट पोहचविणे अवघड आहे. ही सर्व्हीस येण्यामुळे संपूर्ण देशातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे.
स्पेसएक्ससोबत डील केल्याने स्टारलिंकची सेवेला भारतात उपलब्ध करणे ही एक नवी सुरुवात आहे असे भारती एअरटेलचे एमडी आणि व्हाईस चेअरमॅन गोपाल वित्तल यांनी म्हटले आहे. ही कंपनी भारतात नेक्स्ट जनरेशनचे सॅटेलाईट कनेक्टिव्हीटी टेक्नोलॉजी उपलब्ध करण्यासाठी सुरुवात करणार आहे. एअरटेल सोबत स्टारलिंकची डील झाल्याने त्याला टेलिकॉम मार्केटमध्ये जिओच्या तुलनेच आघाडी मिळणार आहे.सध्या जिओ इन्फोकॉम ही देशाची सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आहे.
एअरटेल आणि स्पेसएक्स यांच्या ऐतिहासिक करार झाल्याने देशात स्टारलिंकची सेवाच मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळा आणि आरोग्य केंद्रांना देखील इंटरनेट जोडण्याची संधी मिळणार आहे. स्टारलिंगमुळे कशाप्रकारे एअरटेलच्या नेटवर्कचा विस्तार करायचा यावर देखील एअरटेल आणि स्पेसएक्स संशोधन करणार आहेत.मात्र, भारतातून सर्व अधिकृत नियमाक संस्थांची मंजूरी या कराराला मिळेल तेव्हाच कंपनी स्टारलिंकची सर्व्हीस देशात सुरु करु शकते असे म्हटले जात आहे.