Explainers भारतात केव्हा सुरु झाली मोबाइल सेवा? एका मिनिटांच्या कॉलसाठी किती होता चार्ज?
आज १० मार्च आहे, आजच्या दिवशी १० मार्च १८७६ रोजी अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलीफोनची पहिली यशस्वी चाचणी केली होती. दोन व्यक्तीं दूरवरुन एकमेकांशी संवाद साधण्यासाठी टेलिफोनचा वापर या दिवशी झाला होता. आता त्या टेलिफोन, ते तारायंत्र तो आजचा स्मार्टफोन हा प्रवास थक्क करणारा आहे.

मोबाईल फोन भारतात दाखल होऊन आता तीसहून अधिक वर्षे झाली आहेत. १३ जुलै १९९५ साली भारतात प्रथमच मोबाईल सेवेची सुरुवात झाली. आता मोबाईल युजर्सची संख्या ११६ कोटींच्या पार गेली आहे. १९९५ पासून २०२५ पर्यंत मोबाईल फोन संपूर्णपणे बदलला आहे. आता फोनचा वापर केवळ कॉलींगसाठी नाही तर अनेक कामांसाठी केला जातो. आता स्मार्टफोनचा जमाना असून लोक आपले दैनंदिन बँकेचे व्यवहार, रेल्वे, बस,मेट्रो, सिनेमा-नाटक या सर्वांच्या तिकीटांची खरेदी मोबाईलवरुन लिलया करीत आहेत, ऑनलाईन शॉपिंग, फूड ऑर्डर, वाहन चालवताना मॅपचा वापर, कॅब बुकींग यांसारख्या सर्वच सेवांचा वापर मोबाईलवरुन लोक करीत आहेत. टेलिफोनची पहिली यशस्वी चाचणी अलेक्झांडर ग्रॅहॅम...