
‘Amazon’ने ‘मेगा सॅलरी डे सेल’ सुरु केला आहे. हा सेल 3 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप सारख्या अनेक उत्पादनांवर ऑफर दिल्या जात आहेत.

अॅमेझॉनची एका दिवसात डिलीव्हरी सेवा

Amazonच्या ‘मेगा सॅलरी डे सेल’मध्ये ग्राहकांना टीव्ही मॉडेल्सवर 30 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच 32 इंचाच्या टीव्हीवर 25 टक्केपर्यंत सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे अँड्रॉइड आणि प्रीमियम टीव्ही मॉडेल्सवर 30 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या तीन दिवसांच्या विक्रीमध्ये ग्राहकांना बेस्ट सेलिंग वॉशिंग मशीन आणि एसीएसवर 35 टक्के सवलत मिळू शकेल.

मायक्रोवेव्ह खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत आहे. Amazonच्या सेलमध्ये 9000 रुपयांपासून रेफ्रिजरेटर उपलब्ध आहेत. ज्या ग्राहकांना ऑडिओ उत्पादने खरेदी करायच्या आहेत त्यांच्यासाठी हेडफोनवर 50 टक्के सूट देण्यात आली आहे.

या सेलमध्ये डीएसएलआर, मिररलेस आणि पॉईंट आणि शूट कॅमेरे 27,990 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच, लॅपटॉप व डेस्कटॉपवर ग्राहकांना 30,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल.