India-China Trade : कमाल झाली, आनंदाची बातमी, भारत-चीन व्यापारात याआधी असं कधी घडलं नव्हतं, हे आकडे बघा

India-China Trade : अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावून एकाबाजूला भारताला झटका दिला. त्याचवेळी भारताने दुसऱ्याबाजूला चीनसोबत मैत्री वाढवली. त्याचा फायदा आता दिसू लागला आहे. भारत-चीन व्यापारात याआधी असं कधी घडलं नव्हतं, ते झालय. एकदा हे आकडे बघा.

India-China Trade : कमाल झाली, आनंदाची बातमी, भारत-चीन व्यापारात याआधी असं कधी घडलं नव्हतं, हे आकडे बघा
India-China Trade
| Updated on: Nov 18, 2025 | 8:54 AM

ऑक्टोंबर महिन्यात आयात-निर्यातीचे आकडे समोर आले आहेत. देशनिहाय हे आयात-निर्यातीचे आकडे आहेत. भारताने अमेरिका-चीनला केलेल्या एक्सपोर्ट-इंपोर्टचे आकडे आहेत. हे आकडे आश्चर्यकारक आहेत. भारतातून अमेरिकेला होणाऱ्या एक्सपोर्टमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घसरण दिसून आली आहे. तेच दुसऱ्याबाजूला चीनला होणाऱ्या एक्सपोर्टमध्ये बंपर वाढ झाली आहे. ही वाढ काही छोटी-मोठी नाही, तर तब्बल 40 टक्के चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ दिसली आहे. चीनकडून होणाऱ्या आयातीत 15 टक्क्यापेक्षा जास्त ग्रोथ दिसली आहे. ऑक्टोंबर फेस्टिव महिना होता. दिवाळीच्या काळात चीनमधून भारतात होणारी आयात थोडी वाढते. पण एक्सपोर्टमध्ये अशी वाढ दिसत नाही. चीन आणि अमेरिकेसोबतच्या ट्रेड बद्दल कशा प्रकारचे आकडे समोर आलेत, ते जाणून घ्या.

अमेरिकेला भारतातून होणाऱ्या वस्तू निर्यातीत ऑक्टोंबर महिन्यात सलग दुसऱ्यांदा 8.58 टक्के घट झाली आहे. ही निर्यात 6.3 अब्ज डॉलरची आहे. अमेरिकेने लावलेल्या भरभक्कम 50 टक्के टॅरिफमुळे ही निर्यात कमी झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार आयात 13.89 टक्क्यांनी वाढून 4.46 अब्ज डॉलर झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोंबर दरम्यान अमेरिकेला होणारी निर्यात 10.15 टक्क्याने वाढून 52.11 अब्ज डॉलर झाली आहे. आयात 9.73 टक्क्याने वाढून 30 अब्ज डॉलर झाली आहे. अमेरिकेने 27 ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर 50 टक्के टॅरिफ आकारण्यास सुरुवात केली आहे. द्विपक्षीय व्यापार विस्तारासाठी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार करारावर बोलणी सुरु आहेत. भारतीय टीम ट्रेड डीलसाठी अमेरिकेत आहे.

चीनसोबतचे व्यापाराचे आकडे काय?

दुसऱ्याबाजूला ऑक्टोंबर महिन्यात चीन सोबतच्या व्यापारात कमालीचे आकडे पहायला मिळाले आहेत. भारताकडून चीनला झालेल्या निर्यातीत 40 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली. एका रेकॉर्ड कॅटेगरीमध्ये आपण हे पाहू शकतो. सरकारी आकडेवारीनुसार, चीनला भारतातून होणारी निर्यात 42.35 टक्क्याने वाढून 1.62 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल ते ऑक्टोंबर 2025-26 मध्ये 24.77 टक्क्याच्या वाढीसह व्यापार 10.03 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. याच काळात चीनमधून आयात देखील वाढली. 15.63 टक्क्यांच्या वाढीसह 11.1 अब्ज अमेरिकी डॉलर झाली.

भारताचा आणखी कोणत्या देशांसोबत व्यापार घटला?

चीन बरोबर व्यापार वाढला त्याचा आनंद आहे. पण दुसऱ्याबाजूला संयुक्त अरब अमीरात, नेदरलँड, ब्रिटन, जर्मनी, बांग्लादेश, सिंगापूर, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, इटली, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, बेल्जियम, दक्षिण कोरिया आणि मलेशिया या देशांसोबतच्या व्यापारात घट झाली. आयातीच्या आघाडीवर ऑक्टोंबर महिन्यात रशिया, सौदी अरेबिया, इराक, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि तैवान यांच्याकडून आयातीत घट झाली.