Alert : योजनाच भारी, आधीच झालाय उशीर, पुन्हा म्हणाल थोडं आधी कळलं असतं तर..

Alert : जर तुम्ही करदाते असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी. तुम्हाला 1 ऑक्टोबरपासून ही सवलत मिळणार नाही..

Alert : योजनाच भारी, आधीच झालाय उशीर, पुन्हा म्हणाल थोडं आधी कळलं असतं तर..
गुंतवणुकीसाठी करा घाई..
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 7:35 PM

नवी दिल्ली : जर तुम्ही करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. तुम्ही अटल पेन्शन योजनेचा (APY) लाभ घेऊ इच्छित असाल तर त्वरा करा. कारण 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला या योजनेत सहभागी होता येणार नाही. जो नागरीक टॅक्स (Tax) देतो, त्यांना APY योजनेत सहभागी होता येणार नाही.

या निर्णयाची अधिसूचना केंद्र सरकारने 10 ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. नियमांनुसार, कोणताही नागरिक जो प्राप्तिकर कायद्यांतर्गत कर भरतो, अशा करदात्याला 1 ऑक्टोबरनंतर अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

1 ऑक्टोबरनंतर एपीवाय(APY)साठी अर्ज करणारी व्यक्ती आयकराच्या कक्षेत आल्यास, त्याचा अर्ज आणि खाते ताबडतोब बंद करण्यात येईल, असे या नियमात म्हटले आहे. चुकून अशी नोंदणी झाल्यास पेन्शनचे पैसे खात्यात जमा असतील तर ते अशा लाभार्थ्याला परत करण्यात येणार आहे.

अटल पेन्शन योजनेची पात्रता अथवा अपात्रतेचे नियम पाहिल्यास भारतातील प्रत्येक नागरिक त्यासाठी अर्ज करू शकतो. मात्र आता प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी या योजनेतील सहभाग रद्द करण्यात आला आहे. याविषयीचा नियम त्यांना लागू करण्यात आला आहे. APY साठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जदाराचे बचत खाते असणे आवश्यक आहे. आधी खाते नसेल तर तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. अर्जदाराकडे मोबाईल क्रमांकही असावा. ज्या बँकेत तुम्हाला अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या बँकेत हा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागते.

अटल पेन्शन योजनेच्या दस्तऐवजांमध्ये बँक आणि बचत खात्याचे तपशील, रीतसर भरलेला APY नोंदणी फॉर्म, आधार/मोबाईल क्रमांक तसेच बचत खात्यातील शिल्लक तपशील यांचा समावेश होतो. अटल पेन्शन योजनेअंतर्गत 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन दिली जाते. ही योजना पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे चालविली जाते.

गुंतवणूकदाराला बँकेत APY खाते उघडावे लागते. पैसे बँकेतून खात्यात जमा होतील आणि योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याला पेन्शन मिळेल. ऑटो डेबिट आधारावर खात्यात आपोआप पैसा जमा होतील. एकदा APY फॉर्म नोंदणीकृत झाल्यानंतर दरमहा तुम्ही निर्धारीत केलेली रक्कम निवृत्ती खात्यात जमा होत राहिल.