31 मार्चआधीच करून घ्या ही महत्त्वाची कामं, 1 एप्रिलपासून नियम बदलणार…

| Updated on: Mar 28, 2021 | 9:21 AM

जर आपण ही कामे दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण केली नाहीत तर भारी दंड भरावा लागणार आहे. करासंबंधी काही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे.

31 मार्चआधीच करून घ्या ही महत्त्वाची कामं, 1 एप्रिलपासून नियम बदलणार...
Follow us on

मुंबई : आर्थिक वर्ष 2020-21 लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत काही अशी कामे आहेत जी 31 मार्चपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. जर आपण ही कामे दिलेल्या डेडलाईनमध्ये पूर्ण केली नाहीत तर भारी दंड भरावा लागणार आहे. करासंबंधी काही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे. (avoid penalty you need to complete this work before 31st march 2021)

अशात, 31 मार्च 2021 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला जोडले जाणे आवश्यक आहे. आपण हे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. तसेच आधारला पॅन कार्ड जोडलेले नसले आणि तरीही त्याचा कुठे उपयोग केल्यास दंडसुद्धा होऊ शकतो. हा दंड 10 हजार रुपये इतका असू शकतो.

देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक Bank of Baroda ग्राहकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत (पीएमजेजेबीवाय) दररोज दोन लाख रुपयांचा विमा देत आहे. ही एक मुदत विमा योजना आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत (पीएमजेजेबीवाय) गुंतवणूक करून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात.

पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2021 रोजी निश्चित केली. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी जोडले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय होते. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10000 रुपये दंड आकारला आहे. प्राप्तिकर विभागाने यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Highways) कोरोना साथीच्या कारणास्तव वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयूसीला 1 फेब्रुवारी नंतर 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली होती. यामुळे तुम्ही आपलं ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनाचे आवश्यक कागदपत्र नूतनीकरण न केल्यास 31 मार्चनंतर तुमच्याकडून दंड आकारला जाईल. म्हणून लवकरच सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करून घ्या.

31 मार्च हा आर्थिक वर्ष 2020-21 चा शेवटचा दिवस आहे. ही तारीख 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रीवाईज्ड किंवा लेट इन्कम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख असेल. कोणत्याही आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आईटीआर) फाईल करण्याची मूळ डेडलाईन संपल्यानंतर बिलेटेड रिटर्न फाइल केली जाते, मात्र यासाठी करदात्यांना दंड भरावा लागतो. बिलेटेड आयटीआर 10 हजार रुपयांच्या लेट फायलिंग फीसोबत 31 मार्च 2021 या तारखेच्या आधी जमा करावा लागतो.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. यामुळे तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले का याची खात्री नक्की करा.

आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो. (avoid penalty you need to complete this work before 31st march 2021)

संबंधित बातम्या – 

‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर 30 तारखेपर्यंत पैसे काढण्यावर मर्यादा, वाचा सविस्तर

SBI मध्ये आता घरबसल्या उघडा खातं, ‘अशी’ आहे सगळ्यात सोपी पद्धत

…तर एअर इंडिया कंपनीला बंद करावे लागेल, हरदीपसिंग पुरी यांचे मोठे विधान

(avoid penalty you need to complete this work before 31st march 2021)