बँक ग्राहकांना अलर्ट! जुना IFSC कोड चुकूनही वापरु नका, अन्यथा…

कारण जुना आयएफसी कोड वापरल्याने तुमचे व्यवहार अपूर्ण राहू शकतात. (Bank customers stop old IFSC codes failed transactions)

बँक ग्राहकांना अलर्ट! जुना IFSC कोड चुकूनही वापरु नका, अन्यथा...
banks
| Updated on: Apr 30, 2021 | 3:34 PM

मुंबई : अनेक सरकारी बँका गेल्या काही दिवसांपासून खासगीकरण आणि विलिनीकरण करत आहेत. यामुळे अनेक बँकांच्या सेवेत बदल करण्यात येत आहे. मात्र जर तुम्ही अद्याप तुमच्या बँकेचा आयएफसी कोड (IFSC Code) बदलला नसेल तर तो त्वरित दुरुस्त करा. कारण जुना आयएफसी कोड वापरल्याने तुमचे व्यवहार अपूर्ण राहू शकतात. (Bank customers stop old IFSC codes failed transactions)

नुकतंच अॅक्सिस बँकेने जारी केलेल्या एका नोटीसीनुसार, आरबीआयने जारी केलेल्या एका सूचनेनुसार अॅक्सिस बँकेने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ORBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UTBI) या दोन्ही बँकांचे IFSC बंद केले आहेत. त्यामुळे या बँकेतील खातेधारकांचे जुन्या IFSC कोडद्वारे कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन माध्यमांद्वारे IFSC कोड बदलून घ्यावेत, अशी विनंती केली आहे.

‘या’ बँकांच्या IFSC कोडमध्ये बदल

दरम्यान काही महिन्यांपूर्वी अनेक बँकांचे विलनीकरण करण्यात आले आहे. यात ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक इत्यादी बँकांचा समावेश आहे. जर तुम्हीही या बँकांचे ग्राहक असाल, तर लवकरात लवकर नवीन आयएफएससी को़ड वापरण्यास सुरुवात करावी, अन्यथा तुमचे व्यवहार अपयशी होऊ शकतात.

1 एप्रिलपासून जुने कोड बंद

गेल्या एप्रिल 2020 पासून अनेक बँकांचे विलीनीकरण केले जात आहे. त्याअंतर्गत नवीन IFSC आणि MICR कोड जारी केले आहे.  आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व जुन्या बँकांचे आयएफसी कोड 1 एप्रिल 2021 पासून बंद केले गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्याद्वारे व्यवहार करता येणार नाही.

10 बँकांचे विलिनीकरण

भारत सरकारने बँकाच्या एकत्रीकरण योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण योजना तयार केली होती. यानुसार 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांना राज्याच्या मालकीच्या बँकांमध्ये विलीन करण्याची घोषणा केली. (Bank customers stop old IFSC codes failed transactions)

संबंधित बातम्या : 

Gold Price Today | सलग 7व्या दिवशी सोन्याच्या भावांत घसरण, विक्रमी उच्चांकापेक्षा 10 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Tailoring Shop Scheme | कोरोनाकाळात घर बसल्या शिवणकामातून करा कमाई, सरकार देणार 20 हजार रुपये