
देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. यात बँक ऑफ बडोदाने खास एफडी योजना आणली आहे. बीओबी (BOB) लिक्विड एफडी असे या योजनेचे नाव आहे. बीओबी लिक्विड एफडी बचत खात्याशी संबंधित सुलभ तरलता सुविधेसह एफडीमधून उच्च परतावा मिळविण्याच्या फायद्यांची सुविधा देत आहेत. ही योजना ग्राहकांना संपूर्ण एफडी बंद न करता पैसे काढण्याची सुविधा देते, तसेच आवश्यकतेनुसार ग्राहकांच्या तात्कालिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यात कोणताही अडथळा येणार नसल्याचे या योजनेत सांगण्यात आले आहे.
बँक ऑफ बडोदाची लिक्विड एफडी हा गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या एफडीमधून अंशत: पैसे काढू शकतात. म्हणजेच जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमची संपूर्ण एफडी न तोडता काही पैसे काढू शकता. त्यानंतरही लिक्विड एफडी खात्यात जमा झालेल्या उर्वरित रकमेवर आधीच ठरवून दिलेल्या व्याजदरानुसार व्याज मिळत राहणार आहे. यामुळे ग्राहकांना चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय गरजेच्या वेळी त्यांना सहज पैसेही मिळतात.
अल्पवयीन, हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयूएफ), एकल मालकी इत्यादींसह एकल किंवा संयुक्त नावे असलेल्या व्यक्ती आणि बिगर-व्यक्ती तसेच भागीदारी कंपन्या, सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील कंपन्या इत्यादींसह बिगर-व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. यात प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या, संघटना, क्लब, ट्रस्ट आणि नोंदणीकृत सोसायट्या इत्यादी या मुदत ठेवीसाठी (एफडी) पात्र असणार आहेत. मात्र ही योजना एनआरआय बँकांसाठी उपलब्ध नाहीये. तर या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला बीओबी वर्ल्ड ॲप आणि इंटरनेट बँकिंग सारख्या बँकेच्या डिजिटल चॅनेलद्वारे आणि कोणत्याही शाखेत जाऊन बीओबी लिक्विड एफडी सहज उघडता येणार आहे.
लिक्विड एफडीमध्ये तुम्ही कमीत कमी 5000 रुपये जमा करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा यात दिलेली नाही. गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत आहे. योजनेत बँकेने वेळोवेळी ठरविलेल्या मुदत ठेवींवरील प्रचलित व्याजदर लागू होतील. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या ३.०० कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवी किरकोळ ठेवी मानल्या जातील आणि ३.०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी बल्क डिपॉझिट मानल्या जातील. एफडीच्या कालावधीत आवश्यक तेवढ्या वेळा 1,000/- च्या पटीत मुदतपूर्व देय/ अंशत: पैसे काढण्यास परवानगी या योजनेत देण्यात आली आहे.
बँक ऑफ बडोदाचा बीओबी लिक्विड एफडी हा अष्टपैलू एफडी व्हेरियंट आहे. हे विशेषतः अशा व्यक्तींसाठी योग्य आहे ज्यांना उच्च परताव्यासाठी त्यांचे फंड दीर्घ काळासाठी लॉक करायचे आहेत, तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी बचत शिल्लक ठेवायची आहे आणि अनपेक्षित खर्चांचे निराकरण करण्यासाठी लवचिकता राखायची आहे. प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार व्याज भरणा स्रोतावर कर वजावट (टीडीएस) च्या अधीन आहे.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)