Financial Planning : नवीन वर्षात गुंतवणूक करताना रहा सजग, सरत्या वर्षांतील या चूका ठेवा लक्षात, करा नियोजन, रक्कम होईल डबल

| Updated on: Dec 24, 2022 | 8:17 PM

Financial Planning : नवीन वर्षात गुंतवणूक करताना या चूका टाळा, कमाई करा..

Financial Planning : नवीन वर्षात गुंतवणूक करताना रहा सजग, सरत्या वर्षांतील या चूका ठेवा लक्षात, करा नियोजन, रक्कम होईल डबल
नियोजनामुळे होईल कमाई
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : या वर्षाला निरोप देण्यासाठी आता काहीसाच अवधी शिल्लक आहे. आता आपण अंतिम टप्प्यात दाखल झालो आहोत. नवीन वर्षासाठी (New Year) आपण पुन्हा एकदा नवीन संकल्प करुयात. योग्य आर्थिक नियोजन (Financial Planning) केल्यास, तुम्हाला मोठा फायदा तर होईलच, पण आर्थिक शिस्तही लागेल. या सरत्या वर्षात, 2022 मध्ये क्रिप्टोकरन्सी धराशायी झाली. कर्मचारी कपात, बाजारात मंदीची भीती, वाढती महागाई, आर्थिक अस्थिरता, भूराजकीय तणाव या सर्व बाबींचा परिणाम आपल्या सर्वांवर झालाच. त्यामुळे नवीन वर्षांत याची एकदा उजळणी करुन या चूका टाळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरणार आहे.

क्रिप्टो करन्सीने या वर्षाच्या सुरुवातीला तरुणाईला मोठी भूरळ घातली. गुंतवणूकदारांना अगदी कमी कालावधीत कोट्यवधींचा झटपट फायदा झाला. त्यामुळे तरुणाईच्या उड्या पडल्या. अत्यंत जोखिमेचा व्यवहार असताना गुंतवणूक वाढली. अनेकांनी धडाधड रक्कम गुंतवली.

पण नंतर क्रिप्टो करन्सीला सुरुंग लागला. या चलनात जोरदार घसरण सुरु झाली. गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना कायमच धडा बसला. त्यांची गुंतवणूक काही दिवसातच झपाट्याने कमी झाली. त्यामुळे येत्या वर्षांत अशी चूक न करणे हितवाह ठरेल.

हे सुद्धा वाचा

यंदा पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. भूराजकीय तणावाचा मोठा परिणाम जगासह भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारापासून चार हात दूर राहिले. पण नंतरच्या सहामाहीत बाजार सावरला. पण त्यात हादरे बसत होते. गुंतवणूकदारांचे नुकसान थांबले नाही.

अशातही काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केले. बाजार अस्थिर असतानाही गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना बाजारातून अधिक फायदा मिळाला. त्यांना चांगला परतावा मिळाला.

कोरोना दरम्यान व्याज दर झपाट्याने घसरला होता. यंदा मे 2022 मध्ये बँकांचे व्याजदर वाढायला सुरुवात झाली. आता बँकांनी व्याजदरात 225 बेसिस पॉईंटची वाढ केलेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे महागली आहेत. महागाई आणि कर्जाच्या वाढत्या हप्त्याच्या ओझ्या खाली कर्जदार दबला. त्यामुळे नाहक खर्च टाळण्यासंबंधीचे नियोजन करणे गरजेचे ठरते.

यंदा महागाईमुळे किचनचे मासिक बजेट वाढले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू प्रचंड महागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात खरेदी क्षमता वाढवण्यासाठी आतापासूनच गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. केवळ गुंतवणुकीवर अवलंबून न राहता, इतर कमाईचे मार्ग शोधणे सध्या आवश्यक आहे.

सध्या मुदत ठेवीतील रक्कमेवर चांगला परतावा मिळत आहे. या 2 डिसेंबरपर्यंत 38 बँकांनी त्यांच्या मुदत ठेव योजनेवर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना हा पर्याय दुर्लक्षित करुन चालणार नाही. एफडीवर जास्त व्याज मिळत असेल तर बचतीवर चांगला फायदा होऊ शकतो.

मंदीची चर्चा होत असल्याने तुमच्याकडे निदान पुढील 6 ते 12 महिन्यांचे नियोजन असणे आवश्यक आहे. मंदीच्या काळात नोकरी गेली अथवा व्यवसायात तोटा होत असेल तर पुढील काही दिवस तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामाना करावा लागू नये यासाठीचे नियोजन आवश्यक आहे.