लॉन्च होण्याआधीच लीक झाली Poco X3 Pro ची किंमत, वाचा काय आहे फीचर्स

| Updated on: Feb 20, 2021 | 10:52 AM

पोको एक्स 3 प्रोला हल्लीच बीआईएस सर्टिफाइड साईटवर लिस्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की हा फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

लॉन्च होण्याआधीच लीक झाली Poco X3 Pro ची किंमत, वाचा काय आहे फीचर्स
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भारतात पोको एक्स 3 प्रो (Poco X3 Pro) लॉन्च करण्याविषयी चर्चा सुरू आहे. हा फोन लवकरच भारतातही लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण असं असलं तरी अद्याप या फोनची लॉन्चिंग तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पण तरीदेखील फोनची किंमत लॉन्च होण्याआधीच लीक झाल्याचं समोर आलं आहे. (before launch poco x3 pro price leaked know specification of this phone)

पोको एक्स 3 प्रोला हल्लीच बीआईएस सर्टिफाइड साईटवर लिस्ट करण्यात आलं आहे. ज्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की हा फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

पोको एक्स 3 प्रोचे फीचर्स आणि किंमत

या फोनमध्ये 120Hz डिस्प्ले देण्यात आला असून एक एलसीडी पॅनल दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. या स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 किंवा स्नॅपड्रॅगन 855 प्लस चिप द्वारा सपोर्ट दिला आहे. यामध्ये एक हाय एंड चिपचा उपयोग केला असल्याचं बोललं जात आहे. फोनच्या कॅमेऱ्याविषयी बोलायचं झाल तर यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड रिअर कॅमरा, फास्ट चार्जिंग सपोर्टची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

पोको एक्स 3 प्रो स्मार्टफोनची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. Realme X7 Pro, Xiaomi Mi 10i आणि Samsung Galaxy X62 सारख्या फोनसोबत या फोनची स्पर्धा असणार आहे. (before launch poco x3 pro price leaked know specification of this phone)

संबंधित बातम्या – 

Nissan Magnite की Renault Kiger कोणती कार आहे अधिक दमदार?

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

मोबाईल हातातून पडला तरी डोन्ट व्हरी, ड्रॉप प्रूफ स्मार्टफोन बाजारात, सोबत 5 दिवसांचा तगडा बॅटरी बॅकअप

(before launch poco x3 pro price leaked know specification of this phone)