मोबाईल हातातून पडला तरी डोन्ट व्हरी, ड्रॉप प्रूफ स्मार्टफोन बाजारात, सोबत 5 दिवसांचा तगडा बॅटरी बॅकअप

तुम्ही अ‍ॅडव्हेंचर लव्हर असाल आणि सातत्याने ट्रॅव्हल करत असल्यास ब्लॅकव्ह्यूव बीव्ही 6600 (Blackview BV6600) हा रफ-टफ फोन तुमच्यासाठी आहे.

मोबाईल हातातून पडला तरी डोन्ट व्हरी, ड्रॉप प्रूफ स्मार्टफोन बाजारात, सोबत 5 दिवसांचा तगडा बॅटरी बॅकअप

मुंबई : तुम्ही अ‍ॅडव्हेंचर लव्हर असाल आणि सातत्याने ट्रॅव्हल करत असल्यास ब्लॅकव्ह्यूव बीव्ही 6600 (Blackview BV6600) हा रफ-टफ फोन तुमच्यासाठी आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 8580 MAH बॅटरी दिली आहे, जी 2 ते 5 दिवसांचा बॅकअप देते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर तब्बल 792 तासांचा स्टँडबाय टाईम देतो. (Blackview BV6600 smartphone launched with 8580 mAh battery and 2-5 days of standby time, know more features)

Blackview BV6600 स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरा आणि ढासू डिझाईन मिळेल. सोबतच कंपनीने या फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्टही दिला आहे. याचाच अर्थ तुम्ही कोणत्याही फोनद्वारे तुमचा Blackview BV6600 हा स्मार्टफोन चार्ज करु शकता. दरम्यान, कंपनीने या फोनमध्ये मोठी बॅटरी आणि अनेक दमदार फीचर्स दिले आहेत.

या फोनमध्ये तुम्हाला 5.7 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल जो हँडल करण्यासाठी खूपच सोपा आहे. सोबतच फोनमध्ये तुम्हाला पॉवर एफिशिएंट MediaTek Helio A25 ऑक्टाकोर चिपसेट मिळेल जो 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज स्पेस तुम्ही मायक्रो एसडी कार्डद्वारे 128GB पर्यंत वाढवू शकता. सोबतच तुम्हाला डुअल 4G VoLTE आणि वायरलेस पेमेंटसाठी NFC सपोर्ट मिळेल.

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेंसर मिळेल. ज्यापैकी पहिला सेंसर हा 16 मेगापिक्सलचा आहे जो सॅमसंगचा S5K3P9SX कॅमेरा आहे. यासोबत क्वालिटी फोटोसाठी या फोनमध्ये अजून दोन सेंसर्स देण्यात आले आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा Sony IMX219 सेंसर देण्यात आला आहे.

1.2 मीटरपर्यंत ड्रॉप प्रूफ स्मार्टफोन

कंपनीने Blackview BV6600 स्मार्टफोन हा बाहेरची बॉडी आणि आतील हार्टवेअरच्या बाबतीत खूपच मजबूत बनवला आहे. या फोनच्या आउटरमध्ये रबर कॉर्नर देण्यात आले आहेत. जेणेकरुन हा फोन पडला तरी त्याने फोनला कमी इजा होईल. कंपनीचं म्हणणं आहे की, हा फोन 1.2 मीटरपर्यंत ड्रॉप प्रूफ आहे. तसेच हा फोन शॉक रजिस्टंट आहे.

सोबतच कंपनीने या फोनचं सॉफ्टवेअरदेखील जबरदस्त डिझाईन केलं आहे. या फोनची लोकेशन अॅक्यूरेसी GPS, GLONASS, Beidou, Galileo 4 पोजिशनिंगमुळे अधिक इम्प्रूव्ह झाली आहे. हा फोन हायकर्स, ट्रेकर्स, स्पोर्ट्समन्ससाठी परफेक्ट फोन आहे. हा फोन सध्या चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच हा फोन अन्य मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे.

हेही वाचा

7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका

5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स

(Blackview BV6600 smartphone launched with 8580 mAh battery and 2-5 days of standby time, know more features)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI