AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट

तुम्ही एचडीएफसी बँकेचे खातेदार असल्यास एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल.

Amazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट,  स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 24, 2021 | 11:24 PM
Share

मुंबई : Amazon प्राइम डे सेल 26 जुलै रोजी लाईव्ह होणार आहे. हा दोन दिवसीय सेल दरवर्षी विद्यमान प्राइम ग्राहकांसाठी अ‍ॅमेझॉनद्वारे आयोजित केला जातो. तसेच नवीन प्राईम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी दरवर्षी या सेलचे आयोजन करते. प्राइम डे सेल म्हणजे अशा स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर सूट दिली जाते, ज्यासाठी ग्राहक बर्‍याच दिवसांपासून वाट पहात होते. Amazon स्मार्टफोन, लॅपटॉप, अमझॉन इको डिव्हाइस, होम डिव्‍हाइस, फर्निचरसह इतर कॅटेगरीजमधील वस्तूंवर चांगल्या ऑफर्स देत आहे. (Get up to Rs 35000 Discount on laptops and Rs 10000 off on smartphones in Amazon Prime Day sale 2021)

अमेझॉनने घोषणा केली आहे की, प्रीमियम स्मार्टफोनवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट आणि लॅपटॉप्सवर तब्बल 35,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या जातील. कंपनी Amazon Prime Day सेलदरम्यान OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, HP, boAt, Sony, Amazfit, Lenovo आणि इतर लोकप्रिय ब्रँड्सच्या विविध आयटम्सवर सूट देत आहे.

Amazon निवडक ग्राहकांना बँक ऑफर देखील देणार आहे. आपण एचडीएफसी बँक खातेदार असल्यास एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर तुम्हाला 10 टक्के त्वरित सूट मिळेल. डील अधिक उत्कृष्ट करण्यासाठी आपण आपला जुना फोन एका नवीन फोनसह एक्सचेंजदेखील करू शकता.

या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट

Amazon प्रीमियम तसेच मिड-रेंज आणि बजेट स्मार्टफोन्सवर सवलत देत आहे. यात iPhone 11, iPhone 12 Pro, OnePlus 9, OnePlus 9 Pro, Samsung Galaxy Note 20 आणि इतर स्मार्टफोन्सचा समावेश आहे. Amazon OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10 Pro Max, Redmi Note 10s, Samsung Galaxy M31s सह अनेक मिड रेंज स्मार्टफोनवर आकर्षक डील्स आणि सूट देत आहे. अ‍ॅमेझॉनने नेमक्या डील्स सादर केल्या नसल्या तरी हे असे स्मार्टफोन आहेत, ज्यावर नक्कीच सूट मिळेल. म्हणूनच जर आपण स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करीत असाल तर सेलदरम्यान या स्मार्टफोनचे सौदे तुम्ही तपासून पहायला हवेत.

लेनोव्हो टॅब एम 8 आणि एमआय नोटबुक होरायझन एडिशन यासह अनेक लोकप्रिय लॅपटॉप आणि टॅब सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. तसेच Amazon Boat Airdopes 441, OnePlus Buds Z, आणि Sony WF-1000XM3 वरही सवलत देत आहे. Airdopes 1999 रुपयांमध्ये OnePlus Buds Z 2999 रुपयांमध्ये आणि Sony WF-1000XM3 14,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

मजेदार इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत; मग तात्काळ फोनमध्ये इन्स्टॉल करा हे 10 व्हिडिओ एडिटिंग अॅप्स

(Get up to Rs 35000 Discount on laptops and Rs 10000 off on smartphones in Amazon Prime Day sale 2021)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या