
नेपाळमधील उद्रेक (Nepal Student Protest Violence) जगाने पाहिला. केंद्रीय मंत्र्यांना रस्त्यावर पळवू पळवू बेदम मारहाण करण्यात आली. पंतप्रधानांना पळ काढावा लागला. संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींची घरं जाळण्यात आली. सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थी आणि नागरिकांनी आंदोलन हाती घेतल्यानंतर त्यात अनेकांनी हात धुवून घेतले. मोठा हिंसाचार उसळला. त्यात संसद, पंतप्रधान, राष्ट्रपतींसह मंत्र्यांची घर जाळण्यात आली. नेपाळची लोकसंख्या 3 कोटी इतकी आहे. नेपाळची आजची स्थिती काही असली तरी नेपाळमधील या कंपन्यांच्या जगात दबदबा आहे. या कंपन्यांची जगभरात चर्चा आहे.
भारताशी सर्वात मोठा व्यापार
नेपाळचा जवळपास 64 टक्के व्यापार हा भारतासोबत होतो. तो जवळपास 8 बिलियन अमेरिकन डॉलर इतका म्हणजे 7,04,92,34,49,600 रुपये आहे. भारताकडून नेपाळ 7.041 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आयात तर 0.831 अमेरिकन डॉलर्स इतकी निर्यात करतो. नेपाळची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी, सेवा आणि पर्यटनावर आधारीत आहे.
जेव्हा शहरा शहरात आंदोलन पेटलं. तेव्हा व्यापारावर त्याचा मोठा वाईट परिणाम झाला. नेपाळमधील अनेक उत्पादनं आणि कंपन्या जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातील या पाच कंपन्यांचा बाजारात चांगलाच दबदबा आहे. भारत आणि चीनच्या कंपन्यांना सुद्धा या कंपन्या टशन देतात. या कंपन्यांनी दर्जा आणि गुणवत्तेच्या जोरावर स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे.
CG Corp Global (Chaudhary Group) : Wai Wai Noodles हे जगभरात प्रसिद्ध आहेत. नेपाळची मल्टिनॅशनल कंपनी सीजी कॉर्प ग्लोबलचे हे उत्पादन जगभरात सर्वाधिक खपाचे आहेत. नेस्ले मॅगी आणि आयटीसीच्या यिप्पीला ते टफ फाईट देते. या कंपनीची भारतीय बाजारात 25 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे. कोट्यवधींची उलाढाल आहे. ही कंपनी रिअल इस्टेट,सीमेंट आणि ऊर्जा क्षेत्रातही काम करते.
Nepal Tea Collective : नेपाळची चहा, इलाम चहा हा जगभरात प्रसिद्ध आहे. Nepal Tea Collective अमेरिका, युरोप आणि आशियन देशात सर्वाधिक विक्री होतो.
Himalaya Herbal Products : आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादनात अनेक नेपाळच्या कंपन्या आहेत. त्यात हिमालया हर्बल नेपाळ ही सर्वात आघाडीवर आहे.
Yeti Airlines/Buddha Air : नेपाली एविएशन कंपन्या या घरगुती उड्डाणासाठी ओळखल्या जातात. यती एअरलाईन्स आणि बुद्धा एअर हिमालयात भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी सर्वात खास आहेत. माऊंट एव्हरेस्टच्या वरतून उड्डाण हे या कंपन्यांचे आकर्षण आहे.
Himalayan Distillery/Khukri Rum : खूखरी रम ही जगभरात विशेष लोकप्रिय आहे. जगातील अनेक देशात हा ब्रँड विक्री करण्यात येतो. खुकरी रमची सुरुवात 1959 साली नेपाळमध्ये झाली होती. हा नेपाळचा पहिला डार्क रूम ब्रँड म्हणून ओळखल्या जातो. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलियात या रमचे सर्वाधिक प्रेमी आहेत.