शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवे नियम 30 सप्टेंबरपासून लागू, ..तर खाते बंद होणार

सेबीने खातेधारकांना केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी आणखी दोन महिने दिलेत. त्यामुळे शेअर बाजारात व्यापार करणारे लोक आता त्यांचे खाते 30 सप्टेंबरपर्यंत सक्रिय ठेवण्यासाठी त्यांचे केवायसी तपशील अपडेट करू शकतात.

शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मोठी बातमी; नवे नियम 30 सप्टेंबरपासून लागू, ..तर खाते बंद होणार

नवी दिल्लीः शेअर बाजारात व्यापार करणाऱ्या लोकांसाठी एक मोठी बातमी आलीय. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक डीमॅट आणि ट्रेडिंग खातेधारकांना केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी आणखी दोन महिने मिळालेत. 31 जुलै ही स्टॉक ब्रोकर्सद्वारे डीमॅट आणि ट्रेडिंग खातेधारकांसाठी केवायसी तपशील अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. सेबीने खातेधारकांना केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी आणखी दोन महिने दिलेत. त्यामुळे शेअर बाजारात व्यापार करणारे लोक आता त्यांचे खाते 30 सप्टेंबरपर्यंत सक्रिय ठेवण्यासाठी त्यांचे केवायसी तपशील अपडेट करू शकतात.

केवायसी अपडेट न झाल्यास डीमॅट आणि ट्रेडिंग खाते बंद होणार

कोणत्याही अडचणीशिवाय शेअर बाजारात व्यापार करण्यासाठी खातेधारकांना त्यांचे नाव, पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची मर्यादा केवायसी अंतर्गत वैध आयडी पुराव्यासह पडताळणी करावी लागेल. जर कोणत्याही खातेधारकाने नवीन मुदतीपर्यंत केवायसी अपडेट केले नाही, तर त्याचे डीमॅट आणि ट्रेंडिंग खाते बंद केले जाईल. एकदा खाते बंद झाल्यावर कोणताही खातेदार शेअर बाजारात व्यापार करू शकणार नाही. एवढेच नाही, जरी एका खातेदाराने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर तो केवायसी तपशील अद्ययावत करेपर्यंत आपला हिस्सा आपल्या खात्यात हस्तांतरित करू शकणार नाही. केवायसी तपशील अपडेट केल्यानंतर त्यांची पडताळणी करणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

या परिस्थितीत खाते “पेंडिंग फॉर एक्टिव्हेशन”मध्ये ठेवणार

मोबाईल नंबर आणि सक्रिय ईमेल आयडी कोणत्याही डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांच्या केवायसीमध्ये मोठी भूमिका बजावते. जर एखाद्या खात्याचे केवायसी तपशील अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची पडताळणी केली गेली नाही, तर ती खाती “पेंडिंग फॉर एक्टिव्हेशन” मध्ये ठेवली जातात. स्टॉक ब्रोकर्स ट्रेडिंगसाठी कोणतेही खाते सक्रिय करत नाहीत, जरी सक्रियतेसाठी प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या खातेदाराकडे काही अत्यंत महत्त्वाचे काम असले तरी ते पूर्ण करता येणार नाही. म्हणूनच स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय नॉन स्टॉप ट्रेडिंगसाठी आपले डीमॅट आणि ट्रेडिंग खाते केवायसी वेळेवर अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या संकटात नोकरी गमावली, तर हा व्यवसाय सुरू करा आणि दरमहा 10 लाख कमवा

दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा आणि 2 लाखांचा फायदा मिळवा, अशा पद्धतीनं करा नोंदणी

Big news for stock market investors; The new rules will be effective from September 30, then the account will be closed

Published On - 1:07 pm, Wed, 11 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI