Today Gold Silver Price : सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त

| Updated on: Feb 26, 2023 | 10:06 AM

Today Gold Silver Price : खरेदीदारांना रविवारी स्वस्तात सोने खरेदीची लॉटरी लागली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सोन्यात घसरणीचे सत्र सुरु आहे. आजही भावात मोठी घसरण झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत आज अशी आहे.

Today Gold Silver Price : सोने खरेदीदारांना लागली लॉटरी, 10 ग्रॅम सोने झाले इतके स्वस्त
आजचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : देशात लग्नसराई जोरात सुरु आहे. धडाक्यात लग्न लागत आहेत. या दरम्यान सराफा बाजारात (Sarafa Market) ही खरेदीदारांची लगबग सुरु आहे. आजही भावात मोठी घसरण झाली आहे. खरेदीदारांना रविवारी स्वस्तात सोने खरेदीची लॉटरी लागली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सोन्यात घसरणीचे सत्र सुरु आहे. वायदे बाजारात सोने 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 64000 रुपये प्रति किलोवर विक्री होत आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्याने घसरण झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आठवड्याभरापूर्वी 24 कॅरेट सोने 57,000 हजार रुपये होते. आज 56,330 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके कमी झाले आहे. सोन्यात 1300 रुपयांची घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट सोने आठवड्यापूर्वी 52,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आज हा भाव 51,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. भावात जवळपास 800 रुपयांची घसरण झाली आहे.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी सोने-चांदीच्या दराची घोषणा करत नाही. म्हणजे सोने-चांदीचा नवीन भाव आात सोमवारी जाहीर करण्यात येईल. पण गुडरिटर्नसारखे संकेतस्थळ देशातील सराफा बाजारातील आणि मोठ्या शहरातील सोने-चांदीचे भाव दररोज जाहीर करतात.

गुडरिटर्न्सनुसार, भारतीय सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 51,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. भावात 300 रुपयांची घसरण झाली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोने 280 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्यात तेजी येईल, पण सध्या स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) आज किलोमागे 800 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा कालचा भाव 68,300 रुपये प्रति किलो होता. आज चांदी 67,500 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

हे सुद्धा वाचा

15 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 69,950 रुपये किलो होता. त्यानंतर चार दिवस या किंमतीत तब्बल 2450 रुपये प्रति किलोची घसरण झाली. 22 फेब्रुवारी रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. आता भावात 500 रुपयांची घसरण झाली आहे. 26 फेब्रुवारी रोजी चांदी 67,500 रुपये प्रति किलो आहे.

सोने सध्या त्याचा सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 2272 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी तिच्या उच्चांकी किंमतीपेक्षा 12400 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो होता. दहा दिवसांत सोन्याच्या भावात 700 रुपयांची घसरण झाली आहे.

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,530 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,210 रुपये आहे.