Today Gold Silver Price : सोने खरेदीची संधी! 10 ग्रॅमसाठी मोजा आता इतके रुपये

Today Gold Silver Price : सोने खरेदीदारांसाठी मोठी संधी आहे. गेल्या 10 दिवसांत भावात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या उच्चांकी भावापेक्षा ग्राहकांना स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण आहे.

Today Gold Silver Price : सोने खरेदीची संधी! 10 ग्रॅमसाठी मोजा आता इतके रुपये
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 10:12 AM

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांनी सध्या करन्सी मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बुलियन मार्केटमध्ये सोन्याची मागणी कमी झाली आहे. वायदे बाजारात (Commodity Market) सोन्या-चांदीचा भाव घसरला आहे. कमोडिटी मार्केटमध्ये चांदी 28 सेंट घसरुन 21.39 डालर प्रति औसवर तर सोन्यात 6 डॉलरची घसरण झाली असून ते 1827 डॉलर प्रति औसपर्यंत खाली आले आहे. गुडरिटर्न्सनुसार, भारतीय सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 51,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यात तेजी येईल, पण सध्या स्वस्तात सोने खरेदीची संधी आहे. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) किलोमागे 800 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा कालचा भाव 68,300 रुपये प्रति किलो होता. आज चांदी 67,500 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

15 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव 69,950 रुपये किलो होता. त्यानंतर चार दिवस या किंमतीत तब्बल 2450 रुपये प्रति किलोची घसरण झाली. 22 फेब्रुवारी रोजी भावात 300 रुपयांची वाढ झाली. आता भावात 500 रुपयांची घसरण झाली आहे. 25 फेब्रुवारी रोजी चांदी 67,500 रुपये प्रति किलो आहे.

सोने सध्या त्याचा सर्वकालीन उच्चांकी किंमतीपेक्षा 2272 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी तिच्या उच्चांकी किंमतीपेक्षा 12400 रुपये प्रति किलोने स्वस्त मिळत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो होता. दहा दिवसांत सोन्याच्या भावात 700 रुपयांची घसरण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,180 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,530 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,210 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.