‘या’ 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा

| Updated on: Jan 24, 2021 | 8:52 AM

आरबीआयने देशातील तीन सर्वात मोठ्या बँका ग्राहकांसाठी उत्तम असून तुम्ही या बँकांवर विश्वास ठेवू शकता असं स्पष्ट केलं आहे.

या 3 बँकांमध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, RBI ने केली मोठी घोषणा
बचत खाते उघडण्यापूर्वी या सहा गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात घोटाळा झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. अनेक मोठ्या बँका बुडल्याच्या बातम्याही समोर आल्या. अशा बातम्या आल्या की, आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही याची चिंता सर्वसामान्यांना नागरिकांना सतावत राहते. या सगळ्यामुळे RBI स्वत: अशा घटनांबद्दल ग्राहकांना सतर्क करत असते. यावेळी आरबीआयने देशातील तीन सर्वात मोठ्या बँका ग्राहकांसाठी उत्तम असून तुम्ही या बँकांवर विश्वास ठेवू शकता असं स्पष्ट केलं आहे. (business news rbi announce sbi icici bank hdfc bank are systemically important banks and good for customers)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अमशा तीन मोठ्या बँकांची लिस्ट जारी केली आहे. ज्यामध्ये ग्राहक कसलीही काळजी न करता खातं उघडू शकतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेचं (HDFC Bank) नाव आहे. या तीनपैकी बँकांपैकी खुठल्याही बँकेत तुमचं खातं असल्यास तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. आरबीआयने D-SIB यादी प्रसिद्ध करताना यासंबंधी माहिती दिली आहे.

D-SIB म्हणजे काय?

डी-एसआयबी म्हणजे Domestic Systemically Important Banks. याचा अर्थ असा की अशा बँका ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला जाऊ शकतो. देशात अशा तीन बँका आहेत ज्या ग्राहकांचा विश्वास कायम ठेवत आहेत असं आरबीआयने ही यादी जाहीर करताना लिहलं आहे. खरंतर, कोरोना काळात बँकिंग क्षेत्रात मोठे घोटाळे होताना समोर येत आहे. यामुळे ग्राहकांना विश्वास देण्यासाठी ही यादी जारी करण्यात आली आहे.

RBI ने नेमकं काय म्हटलं?

आरबीआयने D-SIB 2020 ची यादी जाहीर करताना स्पष्ट केलं आहे की, एसबीआय, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँका उत्तम काम करत आहे. कोरोनाचं संकट असून 2020 मध्ये देशांतर्गत बँका म्हणून पद्धतशीरपणे या महत्त्वाच्या काम करत होत्या. यामुळे या बँकांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. (business news rbi announce sbi icici bank hdfc bank are systemically important banks and good for customers)

संबंधित बातम्या – 

Petrol Price Today : देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात, परभणीत दर 95 रुपयांकडे!

Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

असा करा पैसा डबल! फक्त 3 महिन्याच्या FD वर मिळेल पाचपट जास्त फायदा

(business news rbi announce sbi icici bank hdfc bank are systemically important banks and good for customers)