Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Special Story : पैशाला पैसा जोडून बक्कळ कमवाल, गुंतवणुकीआधी लक्षात असूद्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

आता गुंतवणुकीचेही अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात कुठे मिळवाल तुम्ही जास्त नफा.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 24, 2021 | 7:23 AM

मुंबई : गुंतवणूकदार आर्थिक फायद्यासाठी अनेक पद्धती वापरतात. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जास्क परतावा मिळणं. कमी गुंतवणुकीवर जास्त नफा आणि कमी कालावधीत पैसे मिळण्याच्या आशेने लोक कुठेही गुंतवणूक करतात. पण अनेक ठिकाणी यामुळे आर्थिक फटका बसतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुमचं आर्थिक धोरण ठरवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही किती रक्कम गुंतवाल आणि त्यातून किती नफा तुम्हाला अपेक्षित आहे. याचं गणित तुम्हाला माहिती हवं. आता गुंतवणुकीचेही अनेक पर्याय आहेत. त्यामुळे जाणून घेऊयात कुठे मिळवाल तुम्ही जास्त नफा. (business investment on mutual fund will make you successful and more profitable)

खरंतर, शेअर बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदीर नेहमीच चिंतेत असतात. पण यामुळे म्युच्युअल फंडमध्ये पैसे कवण्याची चांगली संधी आहे. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीबद्दल फार काही माहिती नसते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमच्या आर्थिक लक्ष्यांनुसार म्युच्युअल फंड योजना निवडू शकतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही पीएसयू इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. कारण, यामध्ये तीन महिन्यांत बक्कळ परतावा दिला जात आहे. सध्या हा टक्का 27.29 इतका आहे. अशात एफडीवर फक्त 5 टक्के व्याज मिळतं. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदारांचे पैसे लवकर दुप्पट होतात.

सगळ्यात आधी धोरण निश्चित करा

कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला त्यामध्ये पैसै का गुंतवायचे आहेत हे माहित असणं महत्त्वाचं आहे. तुमची स्वतःची आर्थिक उद्दीष्टे असली पाहिजेत. यासाठी तुम्हाला कुठल्याही तज्ज्ञ असण्याची गरज नाही. यासाठी फक्त काही मूलभूत गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं आर्थिक धोरण ठरवा.

का करायची आहे गुंतवणूक ?

तुम्हाला गुंतवणूक का करायची आहे याची सगळी उत्तरं तुमच्याकडे हवीत. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक गणित. त्यानंतर तुम्हाला नफा कुठल्या स्वरुपात हवा हे ठरवा, यानुसार आपण कुठे गुंतवणूक करायची याबद्दल ठरवू शकतो. म्हणजेच लग्न, मुलाचा शाळेचा खर्च, सेवानिवृत्ती किंवा इतर काहीही गुंतवणुकीची कारणं असू शकतात. यावरच तुम्ही किती वर्षांची गुंतवणूक करणार हे अवलंबून असतं.

गुंतवणूकीसाठी बजेट निश्चित करा

तुमचं बजेट हा गुंतवणूकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. गुंतवणूक सुरू करण्यासाठी तुम्हाला किती पैसे आवश्यक लागतील आणि त्यासाठी तुमच्याकडे किती पैसे आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर तुम्हाला वार्षिक एकरकमी गुंतवणूक किंवा मासिक आधारावर गुंतवणूक करायची आहे, याबद्दलही ठरवा.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यामध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी फंडाने तब्बल 31.39 परतावा दिला आहे. तर तीन महिन्यांत हा परतावा 21.86 टक्के आहे. यामध्ये एका वर्षाचा परतावा 5.80 टक्के इतका आहे. एसबीआय पीएसयू फंडाने 6 महिन्यांत 24.07 म्हणजेच 15 टक्के परतावा दिला आहे.

SBI एफडीवर एका वर्षात देते 5% परतावा

– स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांत मॅच्यूअर एफडीवर 2.9% व्याज देते तर 1 वर्षापासून 2 वर्षाच्या कालावधीत एफडीला 5% परतावा मिळतो.

– 2-3 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 5.10% व्याज तर 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत 5.40% व्याज दिलं जात आहे.

– HDFC बँक त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवस आणि 15 ते 29 दिवसांच्या मॅच्यूअर FD वर 2.5% व्याज देते. तर 1 वर्ष ते 2 वर्षांच्या आतमधील मॅच्यूअर FD वर 4.9%, दोन वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 5.15%, 3 वर्ष ते 5 वर्षांच्या टर्म डिपॉझिटवर 5.30% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या मॅच्यूअर लॉन्ग टर्म FD वर आता 5.50% व्याज मिळत आहे.

– ICICI बँक 7 ते 29 दिवसांच्या मॅच्यूअर टर्म डिपॉझिटवर 2.5% व्याज देत आगे. तक 18 महिने ते 2 वर्षांच्या FD 5 टक्के व्याज मिळेल. 2 ते 3 वर्षांच्या टर्म FD वर 5.15% तर 3 ते 5 वर्षांच्या FD वर 5.35 टक्के आणि 3 ते 10 वर्षांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देते.

म्युच्युअल फंडामधून कसे कमवाल पैसे?

– तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही एखाद्या ऑनलाईन अॅप किंवा म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायझरच्या मदतीनेही गुंतवणूक करू शकता.

– यामध्ये जर तुम्ही थेट गुंतवणूक केली तर तुम्हाला म्युच्युअल फंड योजनेचा थेट फायदा होईल. जर तुम्ही सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला म्युच्युअल फंड योजनेच्या नियमित योजनेत गुंतवणूक करता येईल.

– जर तुम्हाला थेट गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जा. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह तुम्ही गुंतवणूक करू शकता.

– म्युच्युअल फंडाच्या थेट योजनेत गुंतवणूकीचा फायदा म्हणजे तुम्हाला कमिशन देण्याची गरज परड नाही. (business investment on mutual fund will make you successful and more profitable)

संबंधित बातम्या – 

2021 च्या पहिल्या तिमाहीत लक्झरी कार्सचा धडाका, Mercedes, BMW, Skoda च्या शानदार कार्स लाँच

Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल

(business investment on mutual fund will make you successful and more profitable)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें