Ethanol Petrol | पुढच्या वर्षापासून गाड्या धावणार ई-20 पेट्रोलवर! देशाची अर्थव्यवस्था होणार आत्मनिर्भर, शेतकरी होणार मालामाल, फायदे वाचून व्हाल दंग

| Updated on: Aug 11, 2022 | 11:08 AM

Ethanol Petrol | आता पुढील वर्षापासून देशात ई-20 पेट्रोल मिळणार आहे. देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मालमाल करण्यासाठी या इंधनावर जोर देण्यात येणार आहे. जाणून घेऊयात काय आहे, ई-20 पेट्रोल,

Ethanol Petrol | पुढच्या वर्षापासून गाड्या धावणार ई-20 पेट्रोलवर! देशाची अर्थव्यवस्था होणार आत्मनिर्भर, शेतकरी होणार मालामाल, फायदे वाचून व्हाल दंग
पेट्रोल होणार स्वस्त?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Ethanol Petrol | पुढील वर्षापासून देशातील गाड्या ई-20 पेट्रोलवर (E-20 Petrol) धावतील. देशाची अर्थव्यवस्था (Economy)आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना (Farmer Benefit) मालमाल करण्यासाठी या इंधनावर जोर देण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन इंधनाचा प्रकार आहे का? तर नाही, हे कोणतेही नवीन इंधन नाही. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (Ethanol)मिसळण्यात येणार आहे. त्यामुळे परदेशात इंधनावर खर्च होणारा भारतीय रुपया वाचणार तर आहेच. पण देशात इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी याविषयीची माहिती दिली आहे. पुढील वर्षी एप्रिलपासून देशातील निवडक पेट्रोल पंपावर 20 टक्के इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलचा पुरवठा सुरू होईल. कच्च्या तेल (Crude Oil Import) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन (Environment Balance) राखण्यासाठी  सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचे दूरगामी परिणाम पहायला मिळतील.

2025 पर्यंत संपूर्ण देशात विक्री

पेट्रोलियम मंत्र्यांनी या व्यापक मोहिमेची माहिती दिली. त्यानुसार 2025 पर्यंत संपूर्ण देशातील पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल असेल. पुरी म्हणाले, “E-20 पेट्रोल एप्रिल 2023 पासून बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होईल. उर्वरित ठिकाणांचा 2025 पर्यंत समावेश करण्यात येणार आहे. राष्ट्रीय जैव-इंधन धोरणांतर्गत सुधारित उद्दिष्टांतर्गत सरकारने 2025-26 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नियोजित वेळेपूर्वी गाठले गेले आहे. नोव्हेंबर 2022 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते, पाच महिने अगोदरच गाठण्यात यश आले आहे. सरकारच्या आणि पेट्रोल पंप चालकांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट जूनमध्ये पूर्ण झाले आहे.

जैव इंधनासाठी मोठा प्लँट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जैव-इंधन दिनानिमित्त दुसऱ्या पिढीचा इथेनॉल प्लांट राष्ट्राला समर्पित केला. इंडियन ऑईल कंपनीच्या (IOC) पानिपत रिफायनरीजवळ असलेल्या इथेनॉल प्लांटची किंमत 900 कोटी रुपये आहे. आयओसीच्या स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित, या प्रकल्पात वर्षभरात सुमारे दोन लाख टन भाताची भुसी वापरण्यात येणार आहे. यामध्ये वर्षाला सुमारे 30 दशलक्ष लिटर इथेनॉल तयार होणार आहे. हरित वायूचे उत्सर्जनही कमी होईल. वार्षिक तीन लाख टन कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीने हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होईल. हे दरवर्षी देशातील रस्त्यांवरून 63,000 गाड्या हटवण्यासारखे आहे.

हे सुद्धा वाचा

41,500 कोटी रुपये वाचवले

पुरी यांनी यापूर्वीच्या निर्णयामुळे किती रुपये वाचले याची माहिती दिली. त्यानुसार, पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळून 41,500 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचले आहे. तसेच, हरित वायू उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली असून शेतकऱ्यांना 40,600 कोटींचा फायदा झाला आहे. अमेरिका, ब्राझील, युरोपियन युनियन आणि चीननंतर भारत जगातील पाचवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे. जगभरात इतर कारणांसाठी इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ब्राझील आणि भारत इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळत आहेत. आता 20% इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलच्या पुरवठ्यामुळे वार्षिक 4 अब्ज डॉलर वाचण्याचा अंदाज आहे. सध्या पेट्रोलमध्ये 10.17 टक्के इथेनॉल मिसळले जात आहे, जे 2020-21 मध्ये 8.10 टक्के आणि 2019-20 मध्ये 5 टक्के होते. 2013-14 मध्ये तो 1.53 टक्के होता. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी 1000 कोटी लिटर इथेनॉलची गरज पडणार आहे. इथेनॉलचे प्रमाण वाढले की कच्च्या तेलाची आयात ही त्याच प्रमाणात कमी होणार आहे.