AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत बनला स्टार, 11 दिवसांमध्ये साइन केले 47 चित्रपट, पण अचानक उद्धवस्त झालं करिअर, आता लग्नात गातो गाणी

90 च्या दशकात एका रात्रीत बनला स्टार. 11 दिवसांमध्ये केले 47 चित्रपट साइन. पण अचानक झालं करिअर उद्धवस्त. आता लग्नात गाणी गाऊन करतो कमाई.

एका रात्रीत बनला स्टार, 11 दिवसांमध्ये साइन केले 47 चित्रपट, पण अचानक उद्धवस्त झालं करिअर, आता लग्नात गातो गाणी
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 10, 2026 | 12:28 PM
Share

Bollywood Actor : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे एका झटक्यात प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले पण तितक्याच वेगाने काळाच्या पडद्याआडही गेले. अशीच एक कथा आहे 90 च्या दशकातील अभिनेता राहुल रॉय यांची. निरागस चेहरा, स्टायलिश हेअरस्टाईल आणि रोमँटिक प्रतिमा यामुळे राहुल रॉय यांनी त्या काळात लाखो चाहत्यांच्या विशेषतः महिला प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

9 फेब्रुवारी रोजी जन्मलेले राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. विशेष म्हणजे, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना केवळ 30 हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं तर अभिनेत्री अनु अग्रवाल यांची फी राहुलपेक्षा जास्त होती. हा चित्रपट त्या काळात ब्लॉकबस्टर ठरला. सलग 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल चाललेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्या काळात राहुल रॉय यांची लोकप्रियता इतकी होती की शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्याही क्रेझपेक्षा राहुलची क्रेझ अधिक असल्याचं म्हटलं जात होतं.

एका चुकीने करिअर संपलं

मात्र म्हणतात ना, यश जितकं वेगाने मिळतं, तितकंच वेगाने नशिबही बदलू शकतं. आशिकीनंतर राहुल रॉय यांचं स्टारडम प्रचंड वाढलं. या यशाच्या भरात त्यांनी अवघ्या 11 दिवसांमध्ये तब्बल 47 चित्रपट साइन केले. घाईघाईत घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना मोठा फटका बसला. या चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं पण त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

स्टायलिश लुकमुळे राहुल रॉय यांना ओळख मिळाली खरी पण त्यांच्या अभिनय क्षमतेवर हळूहळू प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. एकट्याच्या बळावर चित्रपट हिट करण्याची ताकद नसल्याची टीकाही होऊ लागली. दरम्यान, फ्लॉप चित्रपटांच्या मालिकेमुळे आणि ताणतणावामुळे राहुल रॉय यांना शारीरिक आजारांनीही घेरलं. परिणामी, ते हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेले. काही काळानंतर ते केवळ लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्येच दिसू लागले.

ब्रेन स्ट्रोकने बदलले आयुष्य

सन 2020 मध्ये शूटिंगदरम्यान राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. या घटनेनं त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अनेक महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना नव्याने उभं राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. आर्थिक आणि शारीरिक अडचणींमधून मार्ग काढत त्यांनी आयुष्य पुढे नेलं.

आपलं नशीब पुन्हा आजमावण्यासाठी राहुल रॉय यांनी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला. मात्र, आज ते प्रामुख्याने कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. चित्रपटांव्यतिरिक्त, ते लग्नसमारंभ आणि कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून गाणी गाताना दिसतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ