मोदी सरकारचं वृद्ध, विधवा, अपंगांना मोठं गिफ्ट, पेन्शनमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या तयारीत

| Updated on: Jan 27, 2020 | 11:08 AM

सरकारकडून राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (National Social Assistance Scheme) या योजनेत लवकरच मोठा बदल करणार (Elderly Pension may increase) आहे.

मोदी सरकारचं वृद्ध, विधवा, अपंगांना मोठं गिफ्ट, पेन्शनमध्ये दुपटीने वाढ करण्याच्या तयारीत
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम (National Social Assistance Scheme) पेन्शन योजनेत लवकरच मोठा बदल करण्यात येणार (Elderly Pension may increase) आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, विधवा स्त्रिया आणि अपंगाच्या पेन्शन रकमेत वाढ केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मासिक पेन्शन 500 रुपयांहून 1000 रुपये केली जाणार आहे. तर 79 वर्षाखालील ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनची रक्कम ही 200 रुपयांहून 500 रुपये केली जाणार (Elderly Pension may increase) आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राममध्ये (NSAP) काही बदल केले जाणार आहे. सध्या सरकारकडून वृद्ध व्यक्तींना मिळणारी पेन्शन आणि सद्यस्थितीत महागाईशी तुलना केली जाणार आहे. तसेच पेन्शन मिळणाऱ्या लाभार्थींची ओळख करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि जनगणनेचा वापर केला जाणार आहे.

यानुसार आता लाभार्थींची ओळख ही सुरेश तेंडूलकर कमिटीने सांगितलेल्या गरिबी रेषेनुसार करण्यात येऊ (Elderly Pension may increase) शकते.

लाभार्थींची ओळख ही SECC-2011 माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. यामुळे याचा उपयोग हा दुसऱ्यांना फायदे देण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर मात्र ताण येणार आहे. पेन्शनची रक्कम वाढवल्याने सरकारी खर्च दुप्पट होणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या या एनएसपी कार्यक्रम योजनेतमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी चार पेन्शन आणि अक्षमता सहायक योजनांचा समावेश (Elderly Pension may increase) आहे.