Success Story : जोडप्याने इंजिनीअरिंगचा जॉब सोडला, अवघ्या 10 रुपयांच्या पेयातून उभारले 212 कोटींचे साम्राज्य

एका इंजिनीअरने 10 रूपयांपासून सुरू केलेल्या या ब्रँडने आज 212 कोटींंपर्यंत मजल मारली आहे. त्याने फक्त आपल्या शहरातील गरज ओळखली आणि छोट्या शहरात छोट्या जागेत बा कोट्यांवधींचा ब्रँड तयार केला.

Success Story : जोडप्याने इंजिनीअरिंगचा जॉब सोडला, अवघ्या 10 रुपयांच्या पेयातून उभारले 212 कोटींचे साम्राज्य
SUCCESS STORY
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 2:28 PM

अमेरिकेत नोकरी, चांगलं शिक्षण आणि मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी हे सगळं असतानाही एका इंजिनिअरने वेगळी वाट निवडली. हा इंजिनीअर कोयंबटूरचा मूळचा रहिवासी होता. कोयंबटूर हे एक छोटं शहर आहे, त्यामुळे तिथे मिळणाऱ्या सोईसुविधा या देखील मर्यादित प्रमाणात आहेत. पण गावातल्या लोकांना ब्रँडेड वस्तूंची गरज आहे, हे त्याने हेरले आणि याच कल्पनेतून जन्माला आला कोयंबतूरमधील प्रभू गांधीकुमार आणि ब्रिंधा विजयकुमार यांचा TABP हा ब्रँड. सुरूवातीला 10 रूपयांपासून सुरूवात केली आणि या बिझनेसने बघता बघता 212 कोटींपर्यंत मजल मारली.

प्रभू गांधीकुमार यांनी कोयंबतूरमधील पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो अमेरिकेत गेला आणि तिथे जेमतेम 6 वर्षे काम केले. द होम डेपो आणि टीसीएससारख्या कंपन्यांमध्ये काम करताना त्याला मोठ्या व्यवसायाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण आणि पुरवठा. व्यवस्थापन यांचा अनुभव मिळाला. त्याच अनुभवाच्या जोरावर त्याला भारतात आपल्या शहरात स्वत: असं काहीतरी सुरू करण्याचं बळ मिळालं.मुळात ग्रामीण भागातील किंवा छोट्या शहरातील लोकांना चांगल्या दर्जाची पेये मिळण्याच अडचणी असल्याने त्यांच्या लक्षात आले. मोठ्या कंपन्यांची पेये अनेकदा सामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नव्हती. हीच संधी ओळखून प्रभू आणि त्यांच्या पत्नी ब्रिंधा यांनी 2018 मध्ये TABP Snaks & bevrages ची स्थापना केली.

Loading...

त्यांच्या व्यवसायाची खासियत म्हणजे अवघ्या 10 रूपयांत 200 मिली पेय उपलब्ध करून देणे. पनीर सोडा, नन्नारी, जिरा मसाला आणि कोलासाख्या स्थानिक आवडीच्या चवी बाटलीबंद स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर कंपनीने भर दिला. म्हणजे लोकांनी आवडणाऱ्या चवीची पेये स्वच्छ आणि सोयीस्कर पॅकेजिंदमध्ये देण्याची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली.

त्यांच्या कंपनीने उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी वेगळी पद्धत स्वीकारली. पेयांसाठी लागणारे मुख्य कॉन्सन्ट्रेट स्वत: तयार केले, तर बाटलीबंद उत्पादनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाच्या उत्पादन केंद्राशी भागीदारी केली. जाहिरांतींवर मोठा खर्च करण्याऐवजी दुकानदार आणि वितरकांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला.आज कंपनीची 1.2 लाखांहून अधिक उत्पादने आहेत. आता कंपनीचा व्यवसाय 212 कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

मोठा व्यवसाय उभारण्यासाठी महागडी उत्पादने किंवा मोठ्या शहरांतील ग्राहकच आवश्यक असतात. असे नाही. सामान्य माणसाच्या गरजा ओळखून त्याला परवडणाऱ्या किमतीत योग्य उत्पादन दिले, तर छोट्या कल्पनेतूनही मोठा ब्रँड उभा राहू शकतो. हे या उद्योजक दाम्पत्याच्या प्रवासातून दिसून येते.मोठा व्यवसाय उभारण्यासाठी महागडी उत्पादने किंवा मोठ्या शहरांतील ग्राहकच आवश्यक असतात, असे नाही. आज हि कंपनी अनेक लोकांना पगारही देत आहे.  सामान्य माणसाच्या गरजा ओळखून त्याला परवडणाऱ्या किमतीत योग्य उत्पादन दिले, तर छोट्या कल्पनेतूनही मोठा ब्रँड उभा राहू शकतो, हे या उद्योजक दाम्पत्याच्या प्रवासातून दिसून येते

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us