AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: रामच निवडतो आपली पात्रं.. ‘रामायणा’तील भूमिकेविषयी अजिंक्य देव यांचा खुलासा; आधी मिळणार होती दशरथाची भूमिका

Ramayan: नितेश तिवारी यांच्या बिग बजेट 'रामायण' या चित्रपटातील भूमिकेविषयी अभिनेते अजिंक्य देव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले. अजिंक्य देव यांनी चित्रपटातील एका दुसऱ्याच भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं.

Ramayana: रामच निवडतो आपली पात्रं.. 'रामायणा'तील भूमिकेविषयी अजिंक्य देव यांचा खुलासा; आधी मिळणार होती दशरथाची भूमिका
अजिंक्य देवImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 19, 2026 | 2:22 PM
Share

Ramayana: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात मराठी अभिनेता अजिंक्य देव यांनी महर्षी विश्वामित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, अजिंक्य देव यांना सुरुवातीला विश्वामित्र नव्हे, तर राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं? नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या निवडीचा हा रंजक किस्सा सांगितला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजिंक्य देव यांनी सांगितलं की, जवळपास चार वर्षांपूर्वी ‘रामायण’ चित्रपटाच्या कास्टिंगची प्रक्रिया सुरू असताना निर्मात्यांनी त्यांना राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला सांगितलं होतं. मात्र, रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारण्याबाबत ते सुरुवातीला थोडे साशंक होते. त्यावेळी अजिंक्य देव 62 वर्षांचे होते, तर रणबीर कपूर 44 वर्षांचा होता. दोघांच्या वयातील अंतर कमी असल्याने त्यांच्या मनात काहीशी शंका होती.

अजिंक्य देव यांनी सांगितलं की, सुरुवातीला भूमिका स्वीकारण्याबाबत त्यांच्या मनात संकोच होता. मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना ही भूमिका मोठी आणि महत्त्वाची असल्याचं सांगत ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी ऑडिशन दिलं. मात्र, अखेर राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल यांची निवड झाली. याबद्दल बोलताना अजिंक्य देव यांनी अरुण गोविल हेच या भूमिकेसाठी योग्य असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे, 1987 मध्ये रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली होती. आता जवळपास चार दशकांनंतर ते नव्या ‘रामायण’ चित्रपटात श्रीरामांचे वडील दशरथ साकारत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Deo (@ajinkkyadeo)

दशरथाच्या भूमिकेसाठी निवड न झाल्याचं समजल्यानंतर अजिंक्य देव यांना नितेश तिवारी यांनी महर्षी विश्वामित्रांच्या भूमिकेसाठी निवडल्याचं सांगितलं. ही भूमिका मिळाल्यानंतर त्यांना आनंद झाला. त्यांच्या मते, अरुण गोविल यांच्याशिवाय दशरथाच्या भूमिकेसाठी दुसरा चांगला पर्याय असू शकत नव्हता. ‘राम आपली पात्रं स्वतः निवडतो’, अशी भावना त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली. विश्वामित्रांच्या भूमिकेबद्दल बोलताना अजिंक्य देव यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्यांना या ऋषींच्या व्यक्तिरेखेबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र, दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दिलेल्या सूचना आणि चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना या पात्राचं महत्त्व समजत गेलं. श्रीरामांचा जन्म, त्यांचं प्रशिक्षण आणि सीतेच्या स्वयंवरापर्यंतच्या प्रवासात विश्वामित्रांची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात काही दृश्यं चित्रीत करण्यात आली होती, मात्र चित्रपटाची लांबी लक्षात घेऊन ती वगळण्यात आली.

रणबीर कपूरचंही केलं कौतुक

या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी रणबीर कपूरचंही भरभरून कौतुक केलं. रणबीरला श्रीरामांच्या वेशात पहिल्यांदा पाहिल्यापासून त्यांना त्याच्यामध्ये प्रभू रामांचं प्रतिबिंब दिसल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्या अभिनयातील पवित्रता आणि भावभावना व्यक्तिरेखेला साजेशा असल्याचंही ते म्हणाले. नितेश तिवारी यांनी कलाकारांना अभिनय करताना संयम ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोणतंही दृश्य अतिनाट्यमय होऊ नये, याची काळजी दिग्दर्शकाने घेतली. त्यामुळे विश्वामित्रांसारख्या रागीट ऋषींची भूमिका साकारतानाही अजिंक्य देव यांनी चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली संयत ठेवली.

कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत काम

अजिंक्य देव यांनी कपूर कुटुंबातील तीन पिढ्यांसोबत काम केलं आहे. रणबीरसोबतच त्यांनी करिश्मा कपूर आणि नीतू कपूर यांच्यासोबतही काम केलं आहे. त्यांचे वडील, दिवंगत अभिनेते रमेश देव यांनी पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि शम्मी कपूर यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे ‘रामायण’च्या निमित्ताने अजिंक्य देव यांच्या कारकिर्दीतील हा अनुभवही विशेष ठरला आहे.

Follow Us
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक