LPG Price Hike : नवीन वर्षात गॅस दरवाढीची भेट! इतक्या रुपयांची झाली वाढ, नवीन भाव जाणून घ्या

| Updated on: Jan 03, 2023 | 7:38 PM

LPG Price Hike : नवीन वर्षात ग्राहकांना गॅस दरवाढीचा शॉक बसला आहे.

LPG Price Hike : नवीन वर्षात गॅस दरवाढीची भेट! इतक्या रुपयांची झाली वाढ, नवीन भाव जाणून घ्या
दरवाढीचा शॉक
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नईसह देशभरातील ग्राहकांना गॅस दरवाढीचा शॉक लागला. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (LPG Cylinder price) 25 रुपयांची वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2023 रोजी या दरवाढीनंतर (Price Hike) दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची (Commercial LPG) किंमत 1769 रुपये झाली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या किंमती जाहीर करतात. त्याआधारे पुढील महिनाभर नव्या किंमती आधारे सिलेंडर खरेदी करावा लागतो.

दिल्ली व्यतिरिक्त इतर तीन महानगरातही 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली. कोलकत्त्यात गॅस सिलेंडर 1870 रुपये, मुबंईत 1721 रुपये तर चेन्नईमध्ये 1917 रुपये भाव होता. यापूर्वी केंद्र सरकारने सरत्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात झाली.

यंदा सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. सरत्या वर्षात घरगुती गॅसच्या किंमतीत 4 वेळा बदल झाला. चार वेळा गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली. एकूण 153.50 रुपयांची दरवाढ झाली. त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, कोलकत्त्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये भाव आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत सर्वात शेवटी 6 जुलै 2022 रोजी बदल झाला होता. त्यावेळी कंपन्यांनी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली होती.

कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण महागणार आहे. त्यासाठी ग्राहकाला अधिकचा खर्च करावा लागणार आहे.