Petrol Diesel Price Cut : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? तेल कंपन्यांनी काय दिले संकेत

| Updated on: Jun 08, 2023 | 2:38 PM

Petrol Diesel Price Cut : पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा रंगत आणली आहे. गृहकर्ज स्वस्त होण्याचे संकेत मिळत असताना सर्वसामान्यांना महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळू शकतो.

Petrol Diesel Price Cut : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? तेल कंपन्यांनी काय दिले संकेत
कपातीचे संकेत
Follow us on

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात मोठा दिलासा दिला. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याचे संकेत मिळत आहे. आरबीआयने दुसऱ्यांदा रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे. आरबीआयच्या निर्णयामुळे घर आणि कार खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ईएमआय वाढीची कोणतीच चिंता नाही. आता पेट्रोल-डिझेलच्या आघाडीवर पण दिलासा मिळण्याचे संकेत आहे. येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात (Petrol Diesel Price Cut) होण्याची शक्यता आहे. याविषयी पेट्रोलियम कंपन्यांनी काय संकेत दिले आहेत?

​13 महिन्यात नाही दिलासा
जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये घसरण सुरु आहे. आज पण डब्लूटीआय क्रूड ऑयलची किंमत 0.04 डॉलर घसरुण 72.49 रुपयांवर पोहचली. तर ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 76.87 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होऊन गेल्या 13 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 22 मे 2022 रोजी पेट्रोलच्या किंमतीत कपात झाली होती. तेव्हापासून किंमतीत मोठा बदल झाला नाही. देशातील अनेक भागात पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरवर पोहचले. तेल कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेल होईल का स्वस्त
येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता अधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMC) येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करु शकतात. या कंपन्यांच्या तोट्याची भरपाई झाली आहे. तोटा जवळपास भरुन निघल्याने कंपन्या पेट्रोल-डिझेल कपातीचे गिफ्ट देऊ शकतात. गेल्या तिमाहीत या कंपन्यांना जोरदार फायदा झाला. पुढील तिमाहीत जर या कंपन्यांनी जबरदस्त आघाडी घेतली तर किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्यातील तिमाहीत कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केले होते.

हे सुद्धा वाचा

अशी झाली नुकसान भरपाई
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑईलचा सर्व मिळून निव्वळ नफा 52 टक्के झाला आहे. कंपनीने मार्च तिमाहीत 10,841 कोटींचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च तिमाहीत कंपनीने 7,089 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने मार्च तिमाहीत 79 टक्के निव्वळ नफा मिळवला. नफ्याचे गणित पुढील तिमाहीसाठी कायम राहिल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे.

असा झाला रेकॉर्ड
गेल्या वर्षी 2022 च्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात युक्रेनवर रशियाने हल्ला चढविला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. त्याचा थेट परिणाम सर्वच देशांवर दिसून आला. श्रीलंकेसह अनेक छोट्या अर्थव्यवस्था भरडल्या गेल्या. या देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. भारतात तर पेट्रोल 120 लिटरच्या घरात पोहचले. डिझेलमध्ये रेकॉर्डब्रेक उसळी घेतली.