AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल आणणार आनंदवार्ता! या शहरात किंमतीत नाही कोणताच बदल

Petrol Diesel Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. या शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावात कोणताच बदल झाला नाही, तुमच्या शहरातील इंधन किंमती जाणून घ्या एका एसएमएसवर

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेल आणणार आनंदवार्ता! या शहरात किंमतीत नाही कोणताच बदल
जाणून घ्या भाव
| Updated on: Jun 08, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरचा प्रभाव असला तरी भारतात, लवकरच इंधनाच्या दर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल आनंदवार्ता घेऊन येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी या वृत्ताला अधिकृत दुजारा दिला नसला तरी, त्यांनी या वृत्ताचे खंडन पण केले नाही. CNBC Awaaz ने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, तेल उत्पादक कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करणार आहेत. कंपन्यांना झालेला तोटा जवळपास भरुन निघाला आहे. तसेच गेल्या तिमाहीत या कंपन्यांनी जोरदार नफा कमाविला आहे. आज 8 जून रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Rate Today) जाहीर होतो. एका एसएमएसवर तुमच्या शहरातील इंधनाचे भाव तुम्हाला जाणून घेता येतील.

भावाचा दिलासा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात घसरण झाली. जानेवारी 2023 मध्ये किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे सरकल्या होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात जबरदस्त उसळी आली. कच्चे तेल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. 2008 नंतर कच्चा तेलाची ही उच्चांकी उडी होती. जून 2017 पूर्वी इंधनाच्या किंमती दर 15 दिवसांनी अपडेट करण्यात येत होत्या. पण हा नियम बदलण्यात आला. आता रोज भावात बदल होतो.

कच्चा तेलात चढउतार आज कच्चा तेलात वाढ झाली. 8 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.87 डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआय ऑईल 72.49 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव (Crude Oil Price) हे गेल्या 15 महिन्यातील निच्चांकीस्तरावर आहेत.

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.40 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.29 तर डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.48 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.98 पेट्रोल आणि डिझेल 95.65 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.89 आणि डिझेल 93.38 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.26 आणि डिझेल 92.80 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.27 तर डिझेल 92.81 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.69 तर डिझेल 94.18 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.86 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात