करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवी सुविधा

| Updated on: Aug 08, 2021 | 3:57 PM

करदात्यांसाठी करदाते सेवा सुधारण्यासाठी विभागाने प्रलंबित प्रकरणांशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी फेसलेस योजनेअंतर्गत समर्पित ई-मेल आयडी तयार केलेत.

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवी सुविधा
income tax department
Follow us on

नवी दिल्ली : आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी विशेष सुविधा सुरू केलीय. या अंतर्गत आता करदात्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेय. खरं तर आयकर विभागाने करदात्यांना फेसलेस असेसमेंट स्कीम अंतर्गत अनेक पैलूंवर तक्रारी दाखल करण्यासाठी तीन वेगवेगळे अधिकृत ईमेल आयडी जारी केलेत. करदात्यांसाठी करदाते सेवा सुधारण्यासाठी विभागाने प्रलंबित प्रकरणांशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी फेसलेस योजनेअंतर्गत समर्पित ई-मेल आयडी तयार केलेत.

करदात्यांसाठी तक्रार करणे सोपे होणार

करदाते त्यांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी तीन वेगवेगळ्या ईमेल आयडीद्वारे तक्रार करू शकतात, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे. फेसलेस असेसमेंट स्कीम अर्थात ई-असेसमेंट अंतर्गत करदाते आणि कर अधिकारी यांच्यात कोणताही सामना होत नाही. यामुळे करदात्यांना कोणतीही तक्रार दाखल करणे सोपे होईल. तसेच त्यांची समस्या देखील सहज सोडवली जाईल. ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत करदात्यांना आयकर विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

कोणत्या ई-मेल आयडीवर कोणती तक्रार करायची?

आयकर विभागाने जारी केलेल्या 3 ईमेल आयडीवर करदात्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या, तर त्या जलदगतीने सोडवता येतील. कोणत्या ई-मेल आयडीवर कोणत्या प्रकारची तक्रार करता येईल हे समजून घ्या.

>> फेसलेस असेसमेंट योजनेसाठी करदाते Samadhan.faceless.assessment@incometax.gov.in वर तक्रार करू शकतात.
>> करदाते फेसलेस पेनल्टी samadhan.faceless.penalty@incometax.gov.in वापरू शकतात.
>> फेसलेस अपिलासाठी जर तुम्ही samadhan.faceless.appeal@incometax.gov.in ईमेल केले तर ही समस्या लवकरच सोडवली जाईल.

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी

तुम्हीही आयकर परताव्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या 1 एप्रिल ते 2 ऑगस्टदरम्यान 21.32 लाख करदात्यांना सुमारे 45,896 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. आयकर विभागाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. आयटी विभागाने 21.32 वैयक्तिक प्रकरणांमध्ये 13,694 कोटी रुपयांचे परतावे जारी केलेत. त्याचबरोबर 1,19,173 कॉर्पोरेट प्रकरणांमध्ये 32,203 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

चांगली बातमी! परदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारात 1210 कोटींची गुंतवणूक

Consolation to the taxpayers! New facility for filing complaints from Income Tax Department